Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीTata's megaplan : २८ हजार लोकांना मिळणार रोजगार!

Tata’s megaplan : २८ हजार लोकांना मिळणार रोजगार!

मुंबई : भारतीय कंपनी टाटाने देशातच ॲपल अर्थात आयफोन बनवण्याची योजना आखली आहे. कंपनीला भारतात आयफोन निर्मितीचा वेग दुप्पट करायचा आहे. यासाठी टाटा देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतात ॲपल आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे.

जगभरात ॲपलच्या उत्पादनांची वेगळीच क्रेझ आहे. ॲपल सुरुवातीपासूनच आपल्या महागड्या किंमती आणि चांगल्या फिचर्समुळे चर्चेत आहे. परंतु अनेक लोक ॲपलच्या महागड्या किंमतीमुळे ते खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहेत.

ब्लूमबर्ग मीडिया रिपोर्टनुसार, विस्ट्रॉनने आपली आयफोन असेंबली सुविधा टाटा समूहाला विकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, टाटा समूहाने ॲपलचा प्रमुख पुरवठादार विस्ट्रॉनच्या मालकीचा कारखाना ताब्यात घेतला आहे. दक्षिणेकडील कर्नाटक राज्यात असलेला विस्ट्रॉन कारखाना ताब्यात घेण्याचे टाटा समूहाचे उद्दिष्ट होते. टाटा समूहाची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडला १२५ दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केले आहे. टाटाचा विस्ट्रॉन कारखान्यात आयफोन उत्पादन क्षमता वाढवण्याचा मानस आहे. या युनिटमध्ये एकूण ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. १ ते १.५ वर्षात कंपनी २५ ते २८ हजार लोकांना रोजगार देणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -