Friday, October 31, 2025
Happy Diwali

घराच्या साफसफाईवरून भांडण, पत्नीने पतीच्या कानाचा घेतला चावा, करावी लागली सर्जरी

घराच्या साफसफाईवरून भांडण, पत्नीने पतीच्या कानाचा घेतला चावा, करावी लागली सर्जरी

नवी दिल्ली: दिल्लीच्या सुल्तानपुरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका महिलेने रागाच्या भरात आपल्या पतीचा कानच कापला. यामुळे कानाचा वरचा भाग वेगळा झाल्याने पतीला सर्जरी करावी लागली. उपचारानंतर त्या व्यक्तीने पत्नीविरोधात केस दाखल केली आहे.

पोलिसांनी पतीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबतचा तपास सुरू आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती व्यक्ती २० नोव्हेंबरला सकाळी आपल्या घरातील कचरा फेकण्यासाठी बाहेर गेली होती. त्यावेळेस पत्नीने त्याला घर साफ करण्यास सांगितले. जसे ती व्यक्ती घरी परतली तेव्हा पत्नीने भांडण करण्यास सुरूवात केली.

यानंतर पत्नीने त्याला मारण्यास सुरूवात केली. मात्र त्याने तिला धक्का दिला. यानंतर तो घराबाहेर जाण्यास निघाला तेव्हा पत्नीने त्याला मागून पकडले आणि कानाच्या वरच्या भागाचा जोरात चावा घेतला. यानंतर त्या व्यक्तीला मुलगा त्याला मंगोलपुरी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला. येथे त्याच्यावर सर्जरी करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार २० नोव्हेंबरला त्याच रुग्णालयात या हल्ल्याची माहिती मिळाली होती आणि यानंतर एक टीमही आली होती. मात्र पीडित व्यक्ती त्यावेळेस आपला जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नव्हता. त्यांनी पोलिसांना सांगितले की ते आपला जबाब देण्यासाठी पोलीस ठाण्यात येतील. यानंतर २२ नोव्हेंबरला त्याने पोलिसांशी संपर्क केला आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment