
पॅरिस: फ्रान्सची राजधाी पॅरिसमध्ये(paris) एक लग्न झाले आहे. या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. असा दावा केला जात आहे की यात १० अथवा २० लाख नाही तर तब्बल ५०० कोटी रूपये खर्च केले आहेत. हे लग्न १८ नोव्हेंरला झाले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या शतकातील सगळ्यात मोठे लग्न मानले जात आहे. या जोडप्याचे नाव आहे मॅडेलाईन ब्रॉकवे आणि जॅकब लाग्रोन आहे. या दोघांचे लग्न प्रचंड व्हायरल झाले आहे.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारी २६ वर्षीय बिझनेसवुमन मॅडेलाईन ब्रॉकवे, फ्लोरिडामध्ये मर्सिडिज बेंझ डीलरशिपशी संबंधित कंपनी Bill Ussery Motors चे सीईओ रॉबर्ट बॉब ब्रॉकवे यांची मुलगी आहे. या लग्नातील प्रत्येक सोहळा दमदार करण्यात आला. पॅलेस गार्नियरमध्ये एक रिहर्सल डिन, वर्सेस पॅलेसमध्ये राहण्याची सोय, चॅनेलमध्ये दुपारचे जेवण आणि उटाहमध्ये शानदार रिसॉर्ट अमांगिरीमध्ये बॅचलरेट वीक साजरा करण्यात आला.
View this post on Instagram
लग्नाच्या ठिकाणाबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र याचे व्हायरल व्हिडिओ पाहता आयफेल टॉवरचे व्हू असलेल्या बागेत झाले असे दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओवर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने कमेंट करताना म्हटले की परफेक्शन. एखाद्या आर्टपेक्षा कमी नाही. फोटो पेंटिंगसारखे दिसत आहेत. एका अन्य युजरने म्हटले की, फुलांची डिझाईन एका नव्या लेव्हलवर पोहोचली आहे. यात अतिशय सुंदरता आहे.