Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाIPL 2024 : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये शेअर केलेला फोटो, पाहा...

IPL 2024 : हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये शेअर केलेला फोटो, पाहा चाहत्यांची प्रतिक्रिया

मुंबई: हार्दिक पांड्या(hardik pandya) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये(mumbai indians) सामील झाला आहे. मुंबईने आयपीएल २०२४साठी(ipl 2024) पांड्याला संघात सामील केले आहे. हार्दिक याआधी गुजरात टायटन्ससोबत होता. कर्णधार म्हणून त्याने संघाला चॅम्पियन बनवले. मात्र आता तो मुंबईच्या संघात परतला आहे. त्याने सोशल मीडियावर संघाची जर्सी घालत फोटो शेअर केला आहे. यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हार्दिकला २०२२मध्ये गुजरात संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. हा हंगाम त्यांच्यासाठी चांगला होता. पांड्याने १५ सामन्यांत ४८७ धावा केल्या होत्या. यात त्याने ४ अर्धशतके ठोकली होती. यानंतर पांड्याने २०२३मध्ये १६ सामने खेळले आणि या दरम्यान ३४६ धावा केल्या होत्या. पांड्याने यात २ अर्धशतके ठोकली. त्याने कर्णधार म्हणून २०२२मध्ये संघाला चॅम्पियन बनवले होते. तर २०२३मध्ये संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. आयपीएल २०२३चा फायनल सामना गुजरात आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला होता.

हार्दिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात त्याचे करिअर दाखवण्यात आले आहे. हार्दिकचे अनेक फोटो त्या व्हिडिओत दिसत आहे. पांड्याच्या पोस्टवर अनेक प्रकारच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईच्या चाहत्यांनी पांड्याला वेलकम केले आहे. तर अनेक सोशल मीडिया युजर्सनी ट्रोल केले आहे.

हार्दिक पांड्याचे आतापर्यंतचे करिअऱ शानदार राहिले. त्याने १२३ आयपीएल सामन्यात २३०९ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १० अर्धशतके ठोकली. पांड्याने ५३ विकेटही घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी १७ धावांत ३ विकेट ही आहे. पांड्याने २०१५मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्या हंगामात केवळ तीन डाव खेळले होते. हार्दिकने ११२ धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -