मुंबई: थंडीचा(winter) मोसम सुरू झाला आहे. थंडीचा मोसम खरं तर चांगला वाटतो मात्र अनेकदा आजारपणही(ilness) घेऊन येतो. आरोग्य तज्ञांच्या मते थंडीच्या मोसमात काही खास आजारांचा धोका वाढतो. अशातच लोकांनी आपल्या आरोग्याबाबत(health) जागरूक राहिले पाहिजे. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत कोणत्या आजारांचा धोका वाढतो.
थंडीच्या मोसमात होणारे आजार
थंडीच्या मोसमात अनेक प्रकारचे व्हायरस तसेच बॅक्टेरिया अॅक्टिव्ह होतात. हे बॅक्टेरिया श्वासाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात आणि आजारी पाडतात. यामुळे श्वासासंबंधीचे आजार वाढतात. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्यांच्यामध्ये इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.
थंडीच्या दिवसांत कोरडी हवा असल्याने अस्थमा आणि ब्रोंकायटिसचा धोका वाढतो. तसेच मायग्रेनचा त्रासही अधिक जाणवू शकतो. याशिवाय ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो त्यांचा त्रास या मोसमात वाढू शकतो.
या लोकांनी घ्या विशेष काळजी
थंडीच्या दिवसात अशा लोकांनी काळजी घ्यावी ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल.तसेच ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे अशा लोकांनीही आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. छोटी मुलांना या मोसमात न्यूमोनियाचा त्रास होऊ शकतो. यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे असते. ज्या लोकांना अस्थमा, ब्रोकांयटिस अथवा श्वासासंबंधीच्या आजारांचा त्रास आहे त्यांनीही या थंडीच्या दिवसात आरोग्याबाबत सतर्क राहणे गरजेचे असते.