Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीगंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग,पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरिकांची तारांबळ

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग,पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नागरिकांची तारांबळ

पंचवटी (प्रतिनिधी)– गंगापूर धरणातून(gangapaur) जायकवाडी धरणासाठी सायंकाळीं पाच वाजेपर्यंत जवळपास ३१२२ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच यावेळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाणी पातळीत वाढ झाल्याने गोदाघाट परीसरासह पंचवटीत चांगलीच तारांबळ उडाली ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.

गंगापूर धरणातून जायकवाडी धरणासाठी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे गोदाघाट जलमय झाला होता. ऐन हिवाळ्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण व हवेत गारवा निर्माण झाला होता.

पंचवटी सह नाशिक शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊसाने चांगलीच हजेरी लावली. यांमुळे मुख्य बाजारपेठेत ग्राहक आणि विक्रेते यांची धावपळ पाहायला मिळाली. गोदा काठावरील विक्रेत्यांना विक्रीची दुकाने व वस्तू सुरक्षित स्थळी हलविण्यात आली.

पंचवटीतील, गोदाघाट, राम कुंड, भाजी बाजार, आडगाव नाका, मालेगांव स्टॅण्ड, येथील नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली. तसेच पंचवटीलगतच्या ग्रामीण भागातील मखमलाबाद, दरी, मातोरी, म्हसरुळ, आडगाव, नांदूर, मानूर या शिवारातील रब्बी हंगामाच्या पिकांसह द्राक्षाला या पावसाने फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नियोजनाचा फज्जा

अचानक झालेल्या पावसाने मनपाच्या रस्ते, खड्डे, पावसाळी गटार योजनेचा व नियोजनाचा पुन्हा एकदा फज्जा उडाला. रस्त्यावर व खड्ड्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून आले. व सध्या सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या व नवीन रस्त्याच्या डांबरीकरणाचे तीन तेरा वाजले. यातून मनपाच्या अनियमित नियोजनाचे दर्शन नागरिकांना झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -