Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेDharmaveer 2 : धर्मवीर २ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांनी लावली हजेरी

Dharmaveer 2 : धर्मवीर २ च्या चित्रीकरणाचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांनी लावली हजेरी

चित्रपट २०२४ ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

ठाणे : धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या २०२२ साली आलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर (Box Office) सुपरहिट कामगिरी केली. आनंद दिघे यांच्या आयुष्यातले महत्वाचे टप्पे सिनेमात पाहायला मिळाले. त्यानंतर धर्मवीर २ (Dharmaveer 2) या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. आज या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्तसोहळा पार पडला. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.

मुहूर्तसोहळ्याच्या वेळी आनंद दिघे यांच्या तसबिरीला वंदन करण्यात आलं आणि अंबेमातेची आरती करण्यात आली. यावेळेस अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak), सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) आणि निर्माते मंगेश देसाई (Magesh Desai) उपस्थित होते. सर्व कलाकारांनी प्रार्थना करुन सिनेमाच्या शुटींगला सुरुवात केली. ठाण्याच्या कोलशेत भागात आनंदाश्रमचा सेट उभारला आहे. तसेच कल्पतरु बिल्डरच्या जागेवरही या चित्रपटाचा सेट उभारण्यात आला आहे. ठाण्यातील अनेक भागांमध्ये धर्मवीर २ या चित्रपटाचं चित्रीकरण होणार आहे.

पहिल्या भागात आनंद दिघे साहेबांची अखंड राजकीय कारकीर्द प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती, ज्यात शेवटी दिघे साहेबांचे निधन झाल्याचे दाखवल्यामुळे आता दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत निर्माते मंगेश देसाई म्हणाले होते की, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे दोन आपले साहेब आहेत. दिघे साहेबांच्या काही गोष्टी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमात दाखवण्यात आल्या. पण तरी त्यांच्या अनेक गोष्टी वेळेच्या मर्यादेमुळे सिनेमात दाखवण्यात आल्या नाहीत. या दोन्ही साहेबांचा अजेंडा हा ‘हिंदुत्व’ होता. त्यामुळे या दोन्ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ‘धर्मवीर २’ मध्ये दाखवण्यात येणार आहे’. हा सिनेमा पुढच्या वर्षी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -