
व्हिडीओ व्हायरल झाल्याने वाढली चिंता
मुंबई : हल्लीच्या काळात तंत्रज्ञानाचा (Technology) चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात प्रचंड वाढ झाली आहे. डीपफेकच्या (Deepfake) सहाय्याने बॉलिवूड अभिनेत्रींचे अश्लील व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याचे प्रकार घडले. प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) असा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर टायगर ३ मधील एका सीनचा वापर करत कतरिना कैफचाही (Katrina Kaif) डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आला होता. सारा तेंडुलकरचा (Sara Tendulkar) फोटोही एडिट करुन तिच्या भावाच्या जागी शुभमन गिलचा (Shubhman Gill) फोटो अगदी बेमालूमपणे लावण्यात आला होता. यानंतर आता आलिया भटचा (Alia Bhatt) नंबर लागला आहे. आलियाचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिन्ट असलेला ड्रेस परिधान केलेली आलिया भट कॅमेर्यासमोर अश्लील चाळे करताना दिसते. पण ही मुलगी आलिया भट नसून आलियाचा केवळ चेहरा वापरण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यातील खर्या मुलीची अजून ओळख पटलेली नाही. मात्र, तंत्रज्ञानाच्या या चुकीच्या वापरामुळे सगळीकडूनच चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Alert 🚨 #deepfake#RashmikaMandanna#AliaBhatt After Rashmika Mandanna, Alia Bhatt's Deepfake video is now being Circulated. pic.twitter.com/2HqrsiNHhG
— L O K I - God Of Multiverse (@DDieheart) November 27, 2023
रश्मिकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या प्रकारामुळे काय करावं हे मलाही सुचत नव्हतं, त्यामुळे जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्या सर्वांचे आभार. हे जर का मी शाळेत असताना किंवा मला प्रसिद्धी नसताना घडलं असतं तर माझं काय झालं असतं याची मी कल्पनाही करु शकत नाही, असं रश्मिकाने म्हटलं होतं. त्यामुळे डीपफेक हा एक चिंतेचा विषय बनत चालला आहे.