Friday, July 5, 2024
Homeदेशगुजरातमध्ये वीज कोसळून २० जणांचा मृत्यू, अलर्ट जारी

गुजरातमध्ये वीज कोसळून २० जणांचा मृत्यू, अलर्ट जारी

अहमदाबाद : राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता देशाच्या इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. अशातच आता गुजरातमधून एक हृदयद्रावक घटना बातमी समोर आली. गुजरातमध्ये अवकाळी पावसादरम्यान, वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

गुजरातमध्ये काल अवकाळी पावसाने जोरदार हेजरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मनुष्यहानी झाली, शिवाय जनावरांचाही मृत्यू झाला. राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातच्या विविध भागात वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार मृत्यू झाले. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून शक्य त्या ठिकाणी बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली आहे. शाह यांनी प्राण गमावलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी पोहोचण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -