Friday, July 11, 2025

Rain update: महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी, पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता...

Rain update: महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी, पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता...

मुंबई शहराच्‍या बहुतांश भागात शनिवारी ढगाळ वातावरण राहिले. यामुळे गारठा कमी होता. पुढील दोन दिवस पावसासह गारपिठीची शक्‍यता कायम असून, हवामान विभागा‍याने उत्तर महाराष्ट्रासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. ढगाळ वातावरणामुळे पाऱ्यात वाढ होत असून, शनिवारी किमान तापमान १८.९ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वातावरणातून गारवा गायब झाला होता.


अवकाळीची शक्‍यता यापूर्वीच हवामान विभागा‍याने वर्तविली होती. दिवसभर शहरात पाऊस झाला नाही. परंतु ढगाळ वातावरण राहिले. पुढील दोन दिवस पावसाची शक्‍यता असून, काही ठिकाणी गारपिठीचीही शक्‍यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार भागात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वातावरणातून गायब झालेला गारवा पुढील आठवड्यात पुन्‍हा परतणार आहे.


तसेच मुंबईच्या बराचश्या भागात रविवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसापासुन मुंबईच्या बिघडलेल्या वातावरणात सुधारणा होण्यास यामुळे हातभार लागला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे मुंबईचे वातावरण देखील सुधारेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >