Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाVIDEO: शमीने आपल्या कृतीने जिंकली मने, कार अपघातानंतर लोकांचा वाचवला जीव

VIDEO: शमीने आपल्या कृतीने जिंकली मने, कार अपघातानंतर लोकांचा वाचवला जीव

मुंबई: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी(mohammad shami) विश्वचषक २०२३ने(world cup 2023) कमालीची कामगिरी क्ली. त्याने सर्वाधिक २४ विकेट मिळवल्या होत्या. यातच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने लोकांची मने जिंकतील असे काम केले आहे. कार अपघातात जखमी झालेल्या लोकांना शमीने केवळ वाचवलेच नाही तर त्यांची मदतही केली. भारतीय वेगवान गोलंदाज शमीने या घटनेचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यानंतर चाहते त्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

विश्वचषकानंतर ब्रेकवर शमी

विश्वचषक २०२३मध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करताना १० सामने जिंकले होते. दरम्यान, फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. विश्वचषकानंतर वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताचा युवा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. संघाने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळला आहे. दुसरा सामना आज तिरूअनंतपुरम येथे खेळवला जात आहे. दरम्यान, सामन्यात पावसाचा व्यत्यय होऊ शकतो.

टीम इंडिया पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. या दौऱ्यात संघाला ३ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत. कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळू शकते. ही मालिका विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -