अभिनेता रणबीर कपूर(Ranbir kapoor) आणि रश्मिका मंधाना(Rashmika Mandahana) यांचा बहुचर्चित ऍनिमल हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ऍनिमल चित्रपट त्याच्या हटके ट्रेलरमुळे चर्चेत आहे. त्यातच आठवड्यापुर्वी चित्रपटातील ‘हुआ मैं’ हे गाणं रिलीज करण्यात आले होते. ते खुप हीट ठरले.
ऍनिमल चित्रपटातील दुसरं गाणं आता रिलीज झाल आहे या गाण्याचे नाव ‘पापा मेरी जान’ हे असून हे गाणं 2.57 मिनिटांच आहे. या गाण्यात अनिल कपूर(Anil kapoor) आणि रणबीर कपूरच्या मुलगा आणि वडिलांच्या नात्याला इमोशनल पद्धतीने दाखवल आहे तसेच हे गाणं लोकांना भावणार आहे .
हे गाणं सोनू निगमने(Sonu Nigam) गायलं असून तेलगू, तमिळ ,मल्याळम, कन्नड भाषांमध्येही रिलीज झालं. अनिल कपूर ने सोशल मीडियावर हे गाणं रिलीज झाल्याची माहिती दिली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला एक डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.