मुंबई: हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक सकाळी कामासाठी बाहेर पडतात ते थेट रात्री घरी परतातत. ही ९ ते ९ लाईफस्टाईल आजकाल सामान्य झाली आहे. या लाईफस्टाईलमुळे लोकांच्या रिलेशनशिप तसेच वैवाहिक जीवनावक मोठा परिणाम होत आहे. अनेकदा लोक कामाच्या व्यापात आपल्या जोडीदाराकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे आपल्या जोडीदारासाठी वेळ नसतो.
नात्यात एकमेकांना वेळ दिला नाही तर त्याचा परिणाम जोडप्यावर होतो. अनेकदा तणावाचाही सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन बोरिंग होणार नाही.
असे ठेवा आपले प्रेम जिवंत
व्यस्त वेळापत्रक असतानाही तुम्ही अनेक नवीन पद्धतीने आपल्या पार्टनरसोबत बोरिंग झालेले नाते सुधारू शकता. यासाठी तुम्हाला थोडासा वेळ काढावाच लागेल. भले तो वेळ थोडा कमी असेल.
या टिप्स करा फॉलो – भले तुम्ही संपूर्ण दिवस बिझी असाल मात्र गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत. जसे सकाळी एकत्र चहा पिणे, वॉकवर जाणे.
टेक्नॉलॉजीपासून दूर – तुम्ही तुमच्या पार्टनरशी वेळ घालवाताना कोणत्याही प्रकारचे गॅझेट वापरू नका. या दरम्यान, मोबाईल टीव्ही बंद करा. सोबतच तुम्ही फिजीकली आणि मेंटली जोडीदारासोबत राहा.
मिनी ब्रेक गरजेचा – आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाण्यासाठी थोडा वेळ काढा. तुम्ही वीकेंड अथवा लाँग हॉलिडेवर जाऊ शकता.
रात्री झोपण्याआधी संवाद साधा- रात्री झोपण्याआधी एकमेकांशी बोला.तुमचा दिवस कसा गेला हे एकमेकांना सांगा. तसेच संपूर्ण दिवसांत काय घडले हे ही सांगा.