Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

PM Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'चा आज १०७वा एपिसोड

PM Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'चा आज १०७वा एपिसोड

नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतात. आज २६ नोव्हेंबरच्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर कार्यक्रमाचा १०७वा एपिसोड प्रसारित केला जात आहे.


पंतप्रधान मोदींचा हा मासिक रेडिओ कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर उपलब्ध असेल. याशिवाय पंतप्रधान कार्यालय, सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेल्सवरही या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे.



गेल्या एपिसोडमध्ये काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी


गेल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी आशियाई स्पर्धा आणि पॅरा आशियाई गेम्समध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले होते. तसेच गुजरातच्या अंबाजी मंदिरात बनलेल्या मूर्तींबाबत सांगितले होते. याशिवाय पंतप्रधान मोदींनी देशवासियांना सणासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच नागरिकांना लोकल प्रॉडक्ट घेण्याचे आवाहन केले होते. जेव्हा कोणताही नागरिक देशात कोणत्याही ठिकाणी प्रवास करत असेल त्यांनी लोकल उत्पादने घ्यावीत.


गेल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी ही घोषणाही केली होती की ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एक राष्ट्रव्यापी मंच लाँच केला जाईल.

Comments
Add Comment