भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी नैनिताल येथे आपल्या कारमधुन प्रवास करत होता. त्यावेळी त्याच्यासमोरील कार थेट डोंगराळ रस्त्यावरून खाली कोसळली. यावेळी मोहम्मद शमी आपल्या कारने पाठीमागून येत होता. हा अपघात पाहिल्यानंतर मोहम्मद शमीने तातडीने आपली कार थांबवली आणि अपघातग्रस्त तरुणाला मदत केली. याबाबतचा एक व्हिडीओही शमीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या घटनेनंतर मोहम्मद शमीचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केलं जात आहे. हा अपघात नैनिताल येथे घडला आहे. शमीने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली.ज्यामध्ये तो अपघातग्रस्त तरुणाला मदत करताना दिसत आहे.
View this post on Instagram
मोहम्मद शमीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “तो खूप भाग्यवान आहे, देवाने त्याला दुसरं जीवन दिलं आहे. नैनितालजवळच्या डोंगराळ रस्त्यावरून आम्ही जात असताना आमच्या समोरच त्याची कार खाली पडली. आम्ही त्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं.”