मुंबई: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज २६ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्या सामन्यात दोन विकेटनी रोमहर्षक विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यातील विजयासह भारत या मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरा टी-२० सामनाच संध्याकाळी ७ वाजता तिरूअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये असेल.
भारतीय फलंदाज पुन्हा करणार धावांचा पाऊस
टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात धावांचा पाऊस पडला होता तसेच ४००हून अधिक धावा झाला होत्या. फलंदाजी कर्णधार सूर्यकुमार यादव, ईशान किशन, रिंकू सिंह आणि यशस्वी जयसवालने चांगली कामगिरी केली होती. भारताला या सामन्यातही या तिघांकडू चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. पहिल्या सामन्यात रनआऊट होणारे ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माही चांगली खेळी कऱण्याचा प्रयत्न करतील.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. विशाखापट्टणम मध्ये टी-२०मध्ये गोलंदाज अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी अनुक्रमे १०.२५ आणि १२.५०च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. मात्र या तीन गोलंदाजीत विविधतेचा अभाव आहे.
ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाल्यास जोश इंग्लिशने शतक ठोकत टी-२० वर्ल्डकप पाहता चांगले संकेत दिले होते. तर ओपनिंग करणारा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने अर्धशतकी खेळी केली होती. दरम्यान, गोलंदाजी काँगारूच्या गोलंदाजाची स्थिती खराब होती.
भारताचे संभाव्य प्लेईंग ११ – ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैसवाल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेईंग ११ – मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, जोश इंग्लिश, एरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टीम डेविड, मॅथ्यू वेड, सीन एबॉट, नाथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, अॅडम झाम्पा.