वेंगुर्ल्याची देवी सातेरी

Share

कोकणी बाणा: सतीश पाटणकर

ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरीसमोर प्रत्येक वेंगुर्लेवासीय भक्तिभावनेने नतमस्तक होतो. सातेरीचे मंदिर या शहराचे वैभव आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. ५० फूट रुंद व १५० फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे. प्राचीन वास्तुस्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले ४ ते ५ फूट रुंदीच्या भिंतीवर पूर्णपणे दगडी कमानींवर व जुन्या धाटणीच्या, पण वैशिष्ट्यपूर्ण बांधकामावर उभे आहे.

वेंगुर्ले हे नाव या भागास पडण्यास कारण, अशी एक दंतकथा या भागात प्रचलित आहे. त्या कथेचा संबंध थेट श्री देवी सातेरीशी आहे. श्री देवी सातेरी ही मूळ अणसूर या गावची. वेंगुर्लेपासून हे गाव ६ मैल अंतरावर आहे. त्या काळी सुभ्याचे प्रमुख गाव म्हणून प्रसिद्ध होते. वेंगुर्ले हे शहर त्या काळी अस्तित्वात नव्हते. अणसूर या गावात श्री देवी सातेरीचे मंदिर आहे. आज त्या मंदिरास मूळ भूमिकेचे मंदिर म्हटले जाते. त्या मंदिराचे परब आणि गावडे हे दोन प्रमुख मानकरी आहेत. त्या काळातील परब कुळातील एक पुरुष (सध्याच्या वेंगुर्लेच्या परब कुळाचा मूळ पुरुष) नित्यनेमाने वेंगुर्लेहून ६ मैल चालत अणसूर येथे जाऊन श्री देवीची पूजाअर्चा करत असे.

पुढे वृद्धापकाळाने चालत जाणे अशक्य होऊ लागल्याने त्याने देवीची मनोभावे करून भाकली. श्री देवीच्या दर्शनाची व्याकुळता आणि उत्कट निस्सीम भक्तीमुळे त्या पुण्य पुरुषास एके दिवशी दृष्टांत झाला. देवीने प्रसन्न होऊन सांगितले की, मी तुझ्याजवळ येईन. तुझ्या गाईने ज्या जागी पान्हा सोडलेला असेल त्या जागी मी आहे. त्या दृष्टांताप्रमाणे शोध घेतला असता त्याला गाईने पान्हा सोडलेल्या पाषाणावर मातीचे वारूळ झरझर वाढत आहे असे दृश्य दिसले. ते पाहून त्या पुण्य पुरुषाने अतिउत्कट भक्तिभावाने त्या मातीच्या वारुळास मिठी मारली आणि सांगितले, “आई, आता तू येथेच थांब” आणि त्याचबरोबर त्या वारुळाची वाढ थांबली.

मिठी म्हणजे वेंग हा शब्द त्या काळी प्रचलित होता. वारूळ वेंग मारून उरले यावरूनच वेंग मारून उरले ते वेंगुर्ले, असे या नगरीचे नामकरण झाले. श्री देवी सातेरी वारुळाच्या रूपाने प्रकट झाल्यावर कालांतराने तिला एक आकार देऊन मुखवटा तयार केला गेला. श्री देवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे. दर तीन-चार वर्षांनी मूर्ती बदलून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते, त्याला ‘मळ-लेपण’ कार्यक्रम असे म्हणतात. देवीच्या जागरूकतेचा पडताळा आजही लोकांना येतो. नवरात्रीत नारळ, तांदळाची ओटी भरणारा गरीब व सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण करणारा धनवान दोघेही एकाच भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक होताना दिसतात.

श्री देवी सातेरी देवस्थान, वेंगुर्ला हे कोकणातील जागृत देवस्थान आहे. ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरीसमोर प्रत्येक वेंगुर्लेवासीय भक्तिभावनेने नतमस्तक होतो. सातेरीचे मंदिर या शहराचे वैभव आहे. सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. ५० फूट रुंद व १५० फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने ते बनविण्यात आले आहे. प्राचीन वास्तुस्थापत्य शास्त्राचा अजोड नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले ४ ते ५ फूट रुंदीच्या भिंतीवर पूर्णपणे दगडी कमानींवर व जुन्या घाटणीच्या, पण वैशिष्ट्यपूर्ण बांधकामावर उभे आहे. दरवाजा सोडल्यास लाकडाचा वापर न करता बांधलेले पूर्ण दगडी मंदिर म्हणून कुतूहलाने मंदिराकडे पाहिले जाते.

बांधकामात उठून दिसणारा माडीचा भाग व त्यामागे मंदिराच्या सौंदर्यात वाढ करणारा गोल घुमटाकार कळस आहे. मंदिराच्या सौंदर्याला साजेशी सुबक दगडी दीपमाळा व तुळशी वृंदावन खास आकर्षण आहे. श्री देवी सातेरी मंदिरात असलेल्या मूर्तीखाली ते स्वयंभू पाषाण आहे. दर तीन-चार वर्षांनी मूर्ती बदलून पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते, त्याला मळलेपन कार्य असे म्हणतात. देवीच्या जागरूकतेचा पडताळा आजही असंख्य लोकांना येतो. नवरात्रीत नारळ, तांदळाची ओटी भरणारा गरीब व सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण करणारा धनवान दोघेही एकाच भक्तिभावाने देवीसमोर नतमस्तक होताना दिसतात. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Recent Posts

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

59 minutes ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

1 hour ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago

Nitesh Rane : राज्य सरकारचा मत्स्य व्यवसायाबाबत गेमचेंजर निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…

2 hours ago