Sunday, July 6, 2025

Pune: त्रिपुरारीनिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल ४५१ प्रकारच्या मिष्टान्नाचा नैवेद्य

Pune: त्रिपुरारीनिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल ४५१ प्रकारच्या मिष्टान्नाचा नैवेद्य

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या पुजेमध्ये मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर रविवारी दाखविण्यात आला. तब्बल ४५१ प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले होते. अन्नकोट पाहण्यासाठी पुणेकरांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली होती.


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.


ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, की त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोटासाठी पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ४५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ गणरायासमोर मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment