नवी दिल्ली : दिल्लीमध्ये प्रदूषणाची (Pollution) समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दिल्लीचा एक्यूआय (AQI) ५०० वर पोहोचला आहे. हवेची ही पातळी “गंभीर” श्रेणीत मोडते. एक दिवस आधी शुक्रवारी ते ४०० होते.
यंदाचा नोव्हेंबर महिना २०१५ नंतर नऊ वर्षांतील सर्वात प्रदूषित (Pollution) महिना ठरला आहे. या महिन्याच्या २४ दिवसांपैकी असा एकही दिवस गेलेला नाही जेव्हा दिल्लीचा एक्यूआय २०० च्या खाली गेला असेल. या महिन्यात दिल्लीतील लोकांना सतत ‘खराब’, ‘खूप वाईट’, ‘गंभीर किंवा ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीतील हवा श्वास घ्यावी लागत आहे.
दिल्लीतील वीस क्षेत्रे आहेत जिथे एक्यूआय “अत्यंत गंभीर” श्रेणीत पोहोचला आहे. येथील एक्यूआय ४०० च्या पुढे गेला आहे. त्याच वेळी, काही भागात एक्यूआय ४७० च्या पुढे गेला आहे. हे सर्व क्षेत्र आधीच प्रदूषणाचे हॉट स्पॉट म्हणून ओळखले जातात.
सध्या दिल्लीत वाऱ्याचा वेग खूपच कमी झाला आहे. विशेषत: सकाळच्या वेळी वारा अतिशय शांतपणे वाहत असतो. दिवसा वारा वाहत असतानाही त्याचा वेग ताशी चार किलोमीटर इतकाच राहतो. त्यामुळे प्रदूषक कणांचा प्रसार अत्यंत संथ होत चालला आहे. आकाशातही धुक्याचा थर पसरला आहे. लोकांना सामान्यपेक्षा जास्त प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
प्रदूषणाचे हॉट स्पॉट
- आनंद विहार- 460
- अलीपूर- 446
- बवना- 468
- बुरारी-427
- करणी सिंग शूटिंग-416
- द्वारका 437
- विमानतळ-423
- जहांगीरपुरी-469
- जवाहरलाल नेहरू स्टेडियम-402
- मेजर ध्यानचंद स्टेडियम-420
- टेंपल रोड 417
- वजीरपूर-464
- विवेक विहार-471
- सोनिया विहार-449
- शादीपूर-401
- नरेला-431
- पटपरगंज-462
- पंजाबी बाग-463
- आरके पुरम-430
- नजफगड-404