Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीDress Code : रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू

Dress Code : रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ५० मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (Dress Code) लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाविकांना मंदिरांमध्ये प्रवेश करताना कपडे परिधान करण्या संदर्भातले नियम पाळावे लागणार आहेत. अंग प्रदर्शन करणारे, अशोभनीय किंवा तोकडे कपडे घालण्यास या वस्त्रासंहितेनुसार बंदी असणार आहे. तशा प्रकारचे बोर्ड जिल्ह्यातल्या या मंदिरांच्या बाहेर लावण्यात येणार आहेत. मात्र, वस्त्रसंहितेबाबत गणपतीपुळे मंदिर प्रशासन अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

काही महिन्यांपूर्वी राज्यातील मंदिर, धार्मिक स्थळावर ड्रेस कोड लागू करण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. काही ठिकाणी याची अंमलबजावणी झाली होती. तर, काही ठिकाणी हे नियम शिथील करण्यात आले होते. आता, मात्र, रत्नागिरीतील ५० मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. कोकणात पर्यटनासोबत देवदर्शनासाठी जाणारे अनेकजण असतात. त्यातील काही जण पर्यटनासाठीच्या कपड्यांवर देवदर्शन घेतात. त्यामुळे आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरानेदेखील असा निर्णय घेतला होता.

अंग प्रदर्शन करणारे, अशोभनीय किंवा तोकडे कपडे घालण्यास या वस्त्रासंहितेनुसार बंदी असणार आहे. तशा प्रकारचे बोर्ड जिल्ह्यातल्या या मंदिरांच्या बाहेर लावण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली आहे. यानंतर देखील कुणीही भाविक अजाणतेपणे तोकडे किंवा अशोभनीय कपडे घालून आल्यास त्या महिला किंवा पुरुष यांना विनंती करून इतर काही कपडे दिले जाणार आहेत.

खालील मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली आहे…

1. ग्रामदेवता श्री नवलाई मंदिर, नाचणे, ता. रत्नागिरी
2. श्री साई मंदिर, गोडाऊन स्टॉप, नाचणे, ता. रत्नागिरी
3. श्री विश्वेश्वर मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, ता. रत्नागिरी
4. श्री नवलाई मंदिर, पिंपळवाडी, नाचणे, ता. रत्नागिरी
5. श्री ज्योतिबा मंदिर, पेठ किल्ला, रत्नागिरी
6. श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान, राजिवडा, रत्नागिरी
7. श्री दत्त मंदिर खालची आळी, रत्नागिरी
8. श्री मारुती मंदिर संस्था (दक्षिणाभिमुख मारुती मंदिर), मारुती मंदिर, रत्नागिरी
9. श्री साई मंदिर, मोडेवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी
10. श्रीकृष्ण मंदिर, श्री महापुरुष मंदिर, वरचीवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी
11. श्री लक्ष्मीकांत मंदिर, लक्ष्मीकांत वाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी
12. श्रीराम मंदिर, पावस, ता. रत्नागिरी
13. श्री अंबा माता मंदिर, श्री मरुधर विष्णू समाज सभागृह, रत्नागिरी
14. श्री विठ्ठल राम पंचायतन मंदिर, राजापूर
15. श्री निनादेवी मंदिर, राजापूर,
16. श्री कामादेवी मंदिर, राजापूर
17. श्री लक्ष्मीनारायण मंदिर, गुजराळी, राजापूर
18. श्री चव्हाटा मंदिर, जवाहर चौक, राजापूर
19. श्री महाकाली मंदिर, आडिवरे, ता. राजापूर
20. श्री कनकादित्य मंदिर, कशेळी, ता. राजापूर
21. श्रीसत्येश्र्वर मंदिर, कशेळी, ता. राजापूर
22. श्री जाकादेवी मंदिर, कशेळी, ता. राजापूर
23. श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे, ता. राजापूर
वस्त्रसंहिता फलक
24. श्री गणेश मंदिर, मावळत वाडी, कालुस्ते, ता. चिपळूण
25. श्री हनुमान मंदिर, कुंभार वाडी, भिले, ता. चिपळूण
26. श्री देव सिध्देश्वर मंदिर (सिध्देश्वर प्रतिष्ठान), भिले, ता. चिपळूण
27. श्री देव महादेव भानोबा कालेश्री देवस्थान भिले -धामेली ट्रस्ट, भिळे-धामेली, ता. चिपळूण
28. श्री लक्ष्मीकांत देवस्थान, गांग्रई, ता. चिपळूण
29. श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, गांग्रई, ता. चिपळूण
30. श्री दत्त मंदिर, दत्तवाडी, गांग्रई, ता. चिपळूण
31. श्री खेम वाघजाई मंदिर, ग्रामदैवत, बिवली-करंबवणे ग्रामदैवत, ता. चिपळूण
32. श्री गणेश उत्कर्ष मंडळ, बांद्रेवाडी, मालदोली, ता. चिपळूण
33. श्री देव जुना कालभैरव मंदिर, चिपळूण
34. श्री विंध्यवासीनि मंदिर, रावतळे, चिपळूण
35. श्री शिव मंदिर, चिपळूण
36. श्री काळेश्री मंदिर, कान्हे, ता. चिपळूण
37. श्री हनुमान मंदिर, पिंपळी, ता. चिपळूण
38. श्री हनुमान मंदिर, पेढांबे, ता. चिपळूण
39. श्री गणेश मंदिर, नांदिवसे, ता. चिपळूण
40. श्री रामवरदायिनी मंदिर,दादर, ता. चिपळूण
41. श्री मुरलीधर मंदिर, चिपळूण
42. श्री रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट, मजरे दादर(दसपटी ), ता. चिपळूण
43. श्री चंडिका माता मंदिर, गणपतीपुळे
44. श्री सोमेश्वर सूंकाई एन्डोमेंट ट्रस्ट, सडये, पिरंदवणे, ता. रत्नागिरी
45. श्री अंबामाता मंदिर, श्री मरुधर विष्णू समाज, रत्नागिरी.
46. श्री परशुराम मंदिर, परटवणे, रत्नागिरी
47. स्वयंभू श्री महालक्ष्मी देवस्थान न्यास, कारवांचीवाडी, रत्नागिरी
48. श्री महालक्ष्मी मंदिर, आडिवरे, रत्नागिरी
49. श्री कणकादित्य मंदिर, कशेळी, रत्नागिरी

आडिवरे आणि कशेळी येथील ही दोन प्रसिद्ध मंदिर आहेत. त्यांनी हा निर्णय मान्य केलेला असल्याची माहिती दिली आहे. गणपतीपुळे मंदिर प्रशासनासोबत बोलली झालेली आहे. त्यांचा निर्णय देखील पुढील काही दिवसांमध्ये कळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -