Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : पक्षफोडी आणि घरफोडी करणारा पनवती म्हणजे संजय राऊत!

Nitesh Rane : पक्षफोडी आणि घरफोडी करणारा पनवती म्हणजे संजय राऊत!

आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल

मुंबई : क्रिकेट विश्वचषकाच्या (Cricket World Cup) अंतिम सामन्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) अप्रत्यक्षपणे पनवती असं बरळले. त्यामुळे अत्यंत असंबद्ध विधाने करणार्‍या राऊतांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. पक्षफोडी आणि घरफोडी करणारा पनवती असा उल्लेख करत नितेश राणे यांनी राऊतांना चांगलीच चपराक लगावली आहे.

नितेश राणे म्हणाले, डिक्शनरीमध्ये पनवती या नावापुढे आता संजय राजाराम राऊतच लिहावं लागेल. हा चपट्या पायाचा जिथे जिथे जातो तिथे एकतर तो पक्ष संपतो नाहीतर तो घर फोडून टाकतो. उद्धव ठाकरेबरोबर तो चिकटला तर आज उद्धव ठाकरेची काय अवस्था झाली आहे बघा. ना घर का ना घाट का, ना पक्ष हातात राहिला ना घर व्यवस्थित चाललंय.

तसंच पवार साहेबांचं पण झालं आहे. पवार साहेबांच्या जवळ हा गेला आणि पवार कुटुंबियांचं काय झालं आहे ते बघा. राष्ट्रवादी काँग्रेससोबत काय झालं आहे ते बघा. याच्या घरचेही याला किती मोठी पनवती मानतात याची माहिती जर बाहेर दिली तर हा तोंडपण दाखवू शकणार नाही. एक्स्प्रेस टॉवरच्या बाथरुममध्ये काही वर्षांअगोदर काय घडलं हे जर माहिती पडलं तर याला किती मोठी पनवती म्हणावं लागेल!, असं नितेश राणे म्हणाले.

संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, मोदीजींच्याच आशीर्वादामुळे तुझ्या मालकाचे २०१४ आणि २०१९ ला १८ खासदार निवडून आले, तुझ्या मालकाला सत्ता मिळाली आणि तू भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींना नावं ठेवतो? मग तुझ्या मालकाला जरा सांग लपूनछपून पुन्हा युती करण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे, पायघड्या घालण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, तो तुझा मालक आणि त्याची लोकं का करत आहेत? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -