Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNilesh Rane : जाहीर सभा, कॉर्नर सभा, मग खळा बैठका... यानंतर कुठे...

Nilesh Rane : जाहीर सभा, कॉर्नर सभा, मग खळा बैठका… यानंतर कुठे जातील याचा अंदाज तुम्हीच घ्या!

ठाकरे कुठे होते आणि कुठे आले

व्हिडीओमास्टर संजय राऊतांचाच एक दिवस पिक्चर येईल

माजी खासदार निलेश राणे यांचे जबरदस्त टोले

सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर असून ते कोकणात खळा बैठका घेत आहेत. त्यातून ते सरकारवर टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या याच खळा बैठकांवर भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी टीकास्त्र सोडले आहे.

‘आधी आदित्य ठाकरे जाहीर सभा घ्यायचे, त्यानंतर ते कॉर्नर सभा घ्यायला लागले. आता ते थेट खळ्यात आलेत, यानंतर कुठे जातील याचा अंदाज तुम्हीच घ्या’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ‘ठाकरे कुठे होते आणि कुठे आलेत, त्यांची काय अवस्था झालीये. माझ्या त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा’ असा जबरदस्त टोला देखील निलेश राणे यांनी लगावला आहे.

व्हिडीओमास्टर संजय राऊतांचाच एक दिवस पिक्चर येईल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊतील व्हिडीओ शेअर केला आहे. यावर देखील निलेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. निलेश राणे म्हणाले, संजय राऊत रिकामटेकडे असल्यामुळे रोज व्हिडिओ शोधत असतात. त्यांचाच एक दिवस पिक्चर येईल. त्यांची जी भानगड आहे, स्वतःचं किती झाकून ठेवलं आहे ते येणाऱ्या काळात आम्ही दाखवू शकतो.

पुढे ते म्हणाले, राजकारणात काही लोकांनी मर्यादा ठेवायला पाहिजे. संजय राऊत ही व्यक्ती मर्यादा न ठेवणारी आहे. येणाऱ्या काळात त्यांचेही व्हिडिओ निघतील आणि त्यावर दुसऱ्यांवर बोट दाखवून काही फायदा नसेल. पण संजय राऊत आता व्हिडीओ पार्लर चालवल्या सारखं काम करतात. राज्यसभेच्या खासदारांकडून महाराष्ट्राला दिशा मिळेल अशी जी अपेक्षा असते ती त्यांच्याकडून नाही. अजून काही व्हिडीओ बघायचे असतील तर ते त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था करू, असं निलेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -