Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेअनधिकृत बांधकामांवर केडीएमसीचा हातोडा

अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीचा हातोडा

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने धडक कारवाई करत परिसरातील अनधिकृत बांधकामे निष्कासित केली.

कल्याण पूर्वेकडील १०० फुटी रोड लगतच्या आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेले ३ अनधिकृत ढाबे व २ शेड्स, रेल्वे लाईन समांतर रोड मोठागाव ठाकुर्ली ते कोपर रोड (१८ मीटर रुंद) या रस्त्यामधील बाधित होणारी ३ अनधिकृत दुकानं आणि डोंबिवली पूर्व येथील आयरे रोड, कोपर रेल्वे लाईन जवळ कृष्णा मढवी, होडी बंगला यांच्या तळ+७ मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामांवर १ गॅस कटर आणि १ ब्रेकरच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई केली.

दावडी येथील जुनी रिजन्सी येथे प्रस्तावित डीपी रोडवरील अनधिकृत चाळीचे बांधकामही जमीनदोस्त करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार “ड” प्रभागाचे सहा. आयुक्त धनंजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -