गाझा: इस्त्रायल(Israel) आणि हमास(hamas) यांच्यातील युद्ध सुरू होऊन ४९ दिवस झाले आहे. या दरम्यान इस्त्रायल सातत्याने गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ले करत आहे. या कारणामुळे गाझा पट्टीतील मारले गेलेल्या पॅलेस्टाईची संख्या १४५३२वर पोहोचली आहे. यातच पॅलेस्टाईन डॉक्टरांनी गुरूवारी दावा केला की गाझामध्ये संयुक्त राष्ट्र आपातकाली आणि कार्य एजन्सीकडून चालवल्या जाणाऱ्या अबू हुसैन स्कूलवर इस्त्रायलने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ३० लोक मारले गेले आणि ९३ इतर जखमी झाले.
गाझा पट्टीच्या डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की उत्तर गाझामध्ये जबालिया शरणार्थी शिबिरात इस्त्रायलच्या सेनेला निशाणा बनवण्यात आले. हे गाझा पट्टीचे सर्वात मोठे शरणार्थी शिबीर आहे. यात अबू हुसैन शाळाही होती. यावर इस्त्रायलच्या सेनेने हल्ला केला.
अल जजिराच्या रिपोर्टनुसार हजारोंच्या संख्येने फिलीस्तानी लोक जबालिया शरणार्थी शिविरात हिंसा आणि बॉम्बहल्याने घाबरून रागत आहे. या दम्यान इस्त्रायलच्या सेनेने शिबीरात चालवल्या जाणाऱ्या स्कूलला आपला निशाणा बनवला. याशिवाय इस्त्रायलच्या सेनेने उत्तर गाझामध्ये इंडोनेशियाई हॉस्पिटलवरही नव्याने हल्ले केले यात मुख्य एंट्री गेट आणि वीज जनरेटरला निशाणा बनवण्यात आले.
दोन महिने आणखी लढाईची शक्यता
पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्यांच्या बातमीनुसार ७ ऑक्टोबरपासून गाझामध्ये इस्त्रायलकडून होत असलेल्या सततच्या बॉम्बहल्ल्यामध्ये १४५३२हून अधिक लोक मारले गेले. इस्त्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांची संख्या १२०० आहे. यातच कतारच्या मध्यस्थीमुळे इस्त्रायल आणि हमास यांच्यात चार दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.
शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. दरम्यान, इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी गुरूवारी सांगितले की आगामी युद्धविरामानंतर हल्ले कायम ठेवले जातील. आम्ही अधिक बंदी केलेल्यांना परत आणण्यासाठी दबाव टाकत राहू. त्यांनी सांगितले की कमीत कमी दोन महिने आणखी लढाईची शक्यता आहे.