Tuesday, July 1, 2025

Investment: दररोज १०० रूपये गुंतवून तुम्ही बनू शकता करोडपती

Investment: दररोज १०० रूपये गुंतवून तुम्ही बनू शकता करोडपती

मुंबई: आपले भविष्य सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येकजण आपल्या कमाईतून बचत करत असतात. आजची छोटी बचत उद्यासाठी मोठी गुंतवणूक ठरते. दरम्यान, गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते. छोट्या रकमेच्या मदतीनेही तुम्ही मोठा फंड तयार करू शकता.


दररोज तुम्ही १०० रूपये म्हणजे महिन्याला ३ हजार रूपये म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करा. हे पैसे तुम्ही ३० वर्षांपर्यंत गुंतवा. ३० वर्षात तुम्ही १०, ८०,००० रूपये गुंतवाल.


तुम्हाला १२ टक्के रिटर्नच्या हिशेबाने तुम्हाला १,०५,८९,७४१ रूपये मिळतील. या २१ पद्धतीने २१ वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ७,५६,००० रूपये होतील. तुम्हाला २० टक्के रिटर्नच्या हिशेबाने १,१६,०५,३८८ रुपये मिळतील.


म्युचुअल फंड्समध्ये २० टक्क्यांपर्यंत अनेकदा रिटर्न्स देण्यात आले आहेत. करोडपती बनण्याची केवळ एक पद्धत आहे की पैशाने पैसे बनतात. आणि म्युच्युअल फंड्समध्ये कंपाऊंडिंगचा जबरदस्त फायदा मिळतो.


दरम्यान, कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराची मदत अवश्य घ्या.
Comments
Add Comment