मुंबई: विश्वचषक संपल्यानंतर आता टीम इंडियाने(india vs australia) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यास सुरूवात केली आहे. पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. यात भारताने २००हून अधिक धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवला. भारताच्या या विजयात रिंकू सिंहने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दबावात असताना खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत संयमी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. रिंकू सिंहची खेळी पाहून पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीची आठवण आली.
रिंकू सिंह खेळला धोनीसारखी खेळी
महेंद्रसिंग धोनीने १५ वर्षे खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत अनेक वेळा विजयी खेळी केल्या आहेत. तसेच आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून विजय मिळवून दिला आहे. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या अंदाजामध्ये खेळणारा खेळाडू मिळत नव्हता. मात्र आता रिंकू सिंहच्या रूपात भारताला पुढील एमएस धोनी मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडिया २०९ धावाच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत होती. यशस्वी जायसवालने ८ बॉलमध्ये २१ धावांची खेळी करत संघाला एक चांगली सुरूवात करून दिली. मात्र एका चुकीमुळे आपला सहकारी ऋतुराज गायकवाडला बॉल न खेळताच रनआऊट केले.
इशान आणि सूर्याही चमकले
याकारणामुळे टीम इंडियाने केवळ २२ बॉलमध्ये पहिले २ विकेट गमावले होते. मात्र त्यानतंर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यात जबरदस्त भागीदारी झाली. सूर्यकुमार यादवने ४२ बॉलमध्ये ८० धावा तर इशान किशनने ३९ बॉलमध्ये ५८ धावा केल्या. सूर्या आणि इशानच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलिया विजयापासून दूर झाली मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने भारताचे ८ विकेट घेत पुन्हा सामन्यात परतण्याचा विचार केला मात्र दुसरीकडे रिंकू सिंह खेळपट्टीवर उभा होता. रिंकू सिंहने १४ बॉलमध्ये २२ धावांची खेळी केली.