Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीभद्रकाली पोलिसांच्या नाकावर टिच्चून 'रात्रीस खेळ चाले'?

भद्रकाली पोलिसांच्या नाकावर टिच्चून ‘रात्रीस खेळ चाले’?

गुटख्याच्या नावाखाली पुन्हा एकदा ‘एमडी’ची विक्री सुरू असल्याची शक्यता

नाशिक : एकीकडे नाशिकचे माजी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे शहरांमध्ये अवैध धंद्यांना चाप लावत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क करोडो रुपये किमतीच्या ड्रग्सचा कारखानाच उघडकीस आल्याने पोलीस आयुक्त व त्यांच्या टीमच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यास अवघे काही दिवस होत नाही. तोच आता पुन्हा एकदा भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील द्वारका सर्कल येथे मध्यरात्रीच्या सुमारास नेमके सुरू आहे तरी काय? अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह समस्त नाशिककर पोलीस प्रशासनाला विचारताना दिसत आहे.

नुकतेच भद्रकाली परिसरातील काही हॉटेल चालक व दुकान मालक मनमानी करत साडेबारा ते एक वाजे दरम्यान बिनधास्तपणे हॉटेल सुरू ठेवत असल्याचे सचित्र दिसून आले होते. या बातमीनंतर भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी लागलीच कारवाई करत वेळेच्या आत हॉटेल बंद केले. मात्र अद्याप देखील काही हॉटेल्स त्यात हाजी दरबार, KAIYI फास्ट फूड सेंटर हे अजून सुद्धा दुकान आवरत असल्याच्या बहाण्याने रात्री १२ पर्यंत चालू राहते. यांना पोलिसांचा धाक आहे की नाही? असा स्थानिकांना प्रश्न पडला आहे. अन्य बाकी काही हॉटेल्स वेळेत बंद होताहेत त्यांचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परंतु त्यानंतर मात्र याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत द्वारका सर्कलवर मध्यरात्रीच्या सुमारास चक्क एका दुचाकीच्या डिक्कीतून कसल्यातरी अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे सचित्र उघडकीस आले आहे. तसा व्हिडिओ ‘टीम प्रहार’च्या हातात देखील लागला आहे. त्यामुळे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत नेमके सुरू आहे तरी काय? असा प्रश्नचिन्ह समस्त नाशिककर येथे येता-जाता बघत आहे. त्यामुळे गुटख्याच्या नावाखाली पुन्हा एकदा ‘एमडी’ची विक्री तर सुरू झाली नाही ना? अशीही शक्यता व्यक्त होताना दिसत आहे.

येथे पहा Video

याबाबत सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी जातीने लक्ष घालून सदर प्रकारावर “अंकुश” ठेवणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार गुन्हे शोध पथकाच्या (डीबी) वाहन समोरच सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

द्वारका सर्कल वर रात्री एकच्या सुमारास अक्सेस गाडी नंबर MH15 CG 3222 यातून सर्रासपणे अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचे रिॲलिटी चेक मध्ये समोर आले आहे. सदर वाहनाचा नंबर अॅप वर तपासून बघितला असता तो पूर्णपणे “फेक” असल्याचे दिसून आले.

त्यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटची अदलाबदल करून हा सर्व गोरखधंदा सुरू असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे समोरच पेट्रोलिंगवर असलेले पोलिस वाहन नंबर MH 15 EA 0196 या गाडीच्या समक्ष हा अवैध धंद्याचा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे निदर्शनात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -