Monday, December 2, 2024
Homeमहत्वाची बातमीइस्त्रायल-हमास युद्धविरामानंतर बंदी केलेल्या पहिल्या गटाची सुटका, १३ इस्त्रायल आणि १२ थायलंड...

इस्त्रायल-हमास युद्धविरामानंतर बंदी केलेल्या पहिल्या गटाची सुटका, १३ इस्त्रायल आणि १२ थायलंड नागरिकांचा समावेश

गाझा: इस्त्रायल(israel) आणि हमास(hamas) यांच्यातील चार दिवसांचा युद्धविरामाच्या कराराला शुक्रवार २४ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. याअंतर्गत गाझामध्ये हमासने बंदी केलेल्यांपैकी एक गटाची सुटका करण्यात आली आहे.

टाईम्स ऑफ इस्त्रायलच्या माहितीनुसार, बंदी केलेल्या व्यक्तींचा पहिला ग्रु आता रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या स्टाफकडे आहे. त्यांना अॅम्ब्युलन्सद्वारे दक्षिण गाझा येथून रफा क्रॉसिंगच्या माध्यमातून इस्त्रायलमध्ये दाखल केले जाईल. या कराराअंतर्गत पहिल्या ग्रुपमध्ये महिला आणि मुलांसह १३ जणांचा समावेश आहे.

सीएनएनने इजिप्तच्या हवाल्याने सांगितले की याशिवाय १२ थायलंडच्या नागरिकांना सोडण्यात आले आहे. थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांनी सोशल मीडियावर लिहिले की सुरक्षा विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला की १२ थायलंडच्या बंदी केलल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दूतावासाचे अधिकारी पुढील एका तासात त्यांना घ्यायला येत आहे.

किती जणांची होणार सुटका?

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील करारादरम्यान १५० पॅलेस्टाईन कैदींच्या सुटकेच्या बदल्यात गाझामध्ये बंदी बनवण्यात आलेल्या ५० लोकांची सुटका झाली. या ५० लोकांची चार दिवसांत सुटका केली जाणार आहे. या दरम्यान संघर्ष विराम लागू राहील.

कतार, इजिप्त आणि अमेरिकेच्या मध्यस्थी असलेल्या या कराराला इस्त्रायलच्या कॅबिनेटने नुकतीच मंजुरी दिली होती. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी विरोध केला होता.

पहिल्यांदा युद्धविराम

अलजजिराच्या रिपोर्टनुसार, इस्त्रायल आणि हमास यांच्यात सात ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धा गाझाचे १४ हजार ८००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इस्त्रायलमध्ये १ हजार २०० जणांनी आपला जीव गमावला आहे. युद्धानंतर पहिल्यांदा या ठिकाणी युद्धविराम लागला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -