Mumbai Airport: मुंबई एअरपोर्टला बॉम्बने उडवण्याची धमकी, बिटकॉईनने मागितले दहा लाख डॉलर

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत(mumbai) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या(airport) टर्मिनल २ला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी गुरूवारी ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली. यात ४८ तासांच्या आत बिटकॉईनच्या रूपात १० लाख डॉलरची मागणी करण्यात आली आहे.


या प्रकरणी मुंबईच्या सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३८५ आणि ५०५(१)(ब) अंतर्गत केस दाखल केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की मेलच्या आधारावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार quaidacasrol@gmail.com नावाच्या आयडीने हा धमकीचा मेसेज मिळाला. पोलिसांनी पुढे सांगितले की आरोपीने हा इमेल गुरूवारी सकाळी ११ वाजता मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्समध्ये पाठवला आहे.



काय लिहिले होते ईमेलमध्ये?


धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले होते की, विषय - ब्लास्ट. ही तुमच्या विमानतळासाठी शेवटची सूचना आहे. जर बिटकॉईनमध्ये १० लाख डॉलर पत्त्यावर ट्रान्सफर केले नाही तर आम्ही ४८ तासांच्या आत टर्मिनल २चा विस्फोट करून उडवून देऊ. आणखी एक अलर्ट २४ तासांनंतर पाठवण्यात येईल.


दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य पाहता विमानतळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच धमकीचा ईमेल ज्या आयपी अॅड्रेसने पाठवण्यात आला आहे त्याचीही माहिती मिळवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम