Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : ते तुझ्या बापाचे नोकर आहेत काय?

Swami Samartha : ते तुझ्या बापाचे नोकर आहेत काय?

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

सुंदराबाई दिवसेंदिवस शिरजोर होऊ लागली. तिच्यापासून चोळाप्पा व सर्व सेवेकऱ्यांना अतिशय त्रास होऊ लागला. एकदा एका भक्ताने श्री स्वामी समर्थांपुढे २५ रुपये ठेवले.

श्री स्वामींनी ते चोळाप्पास देण्यास सांगितले. बाई रुपये देईना. शेवटी महाराजांनी रागावून तिला दोन-चार जोडे मारले. तेव्हा तिने रागावून ते रुपये फेकून दिले. बाई सेवेकऱ्यास नेहमी म्हणे, “फुकटचे खातात आणि पुष्ट झाले आहेत!” हे ऐकून महाराज तिला म्हणाले, “काय गं, तुझ्या बापाचे ते नोकर आहेत काय?” मथितार्थ दरबारात प्रस्थ वाढत गेले. त्यामुळे ती शिरजोर होऊन कुणासही जुमानत नसे. प्रसंगी ती श्री स्वामींवरही अधिकार गाजवून मर्यादेचे उल्लंघन करीत असे. श्री स्वामी समर्थांच्या वेळी सुंदराबाईंसारख्या व्यक्ती होत्या. आताही आहेत याचा शोध आणि बोध हा ज्याचे त्याने घ्यावयाचा आहे. असेच एकदा स्वामी समर्थांच्या भक्ताने श्री स्वामींपुढे पंचवीस रुपये भक्तिभावाने ठेवले. भाव-भक्तीने अर्पण केलेले कोणतेही धन, वस्तू अथवा अन्य काहीही भवगंत स्वीकारतो. भक्ताच्या भक्तीवर तो कृपानुग्रह करतो. भक्तीचे हे धन तो सेवेकऱ्यास व अन्य गरजूंसही हस्ते परहस्ते अथवा अन्य माध्यमातून देत असतो. कारण परमेश्वर हा निर्मोही, निरीच्छ, कोणताही संचय न करणारा, सदैव अकांचन, द्रव्यरहित वावरणारा, भक्तांवर सदैव कृपा करणारा असतो. पण होते काय की देवाच्या आजूबाजूला सततच्या सेवेत वावरून अथवा पूजाअर्चा करूनही अध्यात्मातला हा समर्पित भाव त्यांना कळत नाही. देवापुढे येईल ते घ्यायचे. अधिक मिळविण्यासाठी झगडायचे. देवाच्या सेवेपेक्षा देवापुढे ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंवरच अधिक डोळा ठेवायचा. सुंदराबाई ही या वृत्तीत आकंठ बुडालेली होती. सदेह स्वरूपात वावरणाऱ्या श्री स्वामी समर्थांसारख्या परब्रह्माचीही तिला पर्वा नव्हती. सुंदराबाई फक्त वर्तमानातला स्वार्थ समजत होती. या स्वार्थाचा, हावरटपणा अथवा लोभाचा अंत काय? याची कल्पनाही तिला नव्हती. कारण ती तिची सारासार विवेकशक्ती पूर्णत गमावून बसली होती. याची तिला पुढे जबरदस्त किंमत मोजावी लागली.

या संबंधात आपण याच ग्रंथात अन्यत्र बघणार आहोता. ‘निर्मोही’, निष्कामपणा, सेवेतील समर्पितता आणि उपास्य दैवाताप्रति दृढ भक्ती’ हे सेवेतील सूत्र कधीही विसरता कामा नये, हा यातला मुख्य बोध आहे. पण सुंदराबाई मात्र ते विसरली होती. श्री स्वामींना या अतिरेक, उद्धट, माजोरी वर्तनाचा राग आल्यावर ते तिला कडक शब्दात फटकारतात, “काय गं, ते तुझ्या बापाचे नोकर आहेत काय?” श्री स्वामींच्या या कडक कानउघाडणीने तिचा नाइलाज झाला. घेतलेले पैसे रागारागाने तिने फेकून दिले. याचा भावार्थ असा आहे की, तिच्यातला स्वार्थ, लोभ उद्यापही जशाचा तसाच आहे. साधारणत आपण प्रापंचिक माणसे देवभक्ती देहाने करतो. कारण भक्ती करताना कोणत्याही स्वरूपाचा का हाईना आपला स्वार्थ सुटलेला नसतो. मनात रुजलेले षडरिपू कमी झालेले नसतात. आपण करीत असलेली देवभक्ती तीर्थयात्रा-पारायणे-अनुष्ठाने-दर्शने अभिषेक आदी सारे-सारे वरकरणी असते. काही तरी मागण्यासाठी अथवा ईच्छापूर्तीसाठी आपला खटाटोप चाललेला असतो. त्यामुळे आपली भक्ती दांभिक असते. भक्ती ही अंतकरणातून, सूक्ष्मदेहात झिरपत जावयास हवी. त्यात निष्काम-निर्मोही-समर्पित भाव असावा. भक्तीत अंतर्बाह्य शुद्धता अपेक्षित असते. अर्थात हे सर्व प्रयत्न साध्य निश्चित आहे.

तुळशी विवाहदिनी संदेश

स्वामी वदे सुंदरा आधी होती साधी,
नंतर पैशाने झाली सोधी॥१॥
आधी होती स्वामी भक्त पैसा,
दक्षिणाने झाली सक्त॥२॥
श्रीमंताच्या उपयोगी फक्त,
गरिबांना जाच करी सक्त॥३॥
श्रीमंताकडे लाच मागे सक्त,
स्वामी दर्शन केले अव्यक्त॥४॥
चोळप्पा दादागिरी फक्त,
बाळाप्पाकडे मागे सारे नक्त॥५॥
अनेक भक्तांना जिने लुबाडले,
अनेकांना गुपचूप गंडवले॥६॥
घरातले दूध, तूप उरे,
भरपूर दूध लोणी पुरे॥७॥

तरी ब्राह्मणांची पळविली गाईगुरे
म्हशी-घोडी स्वार्थापोटी भान नुरे॥८॥
साडीचोळी, धनधान्य न पुरे
आंगठी, पैसे दक्षिणा चोरे॥९॥
स्वामी उघडला तिसरा डोळा
केला सुंदराचा पालापाचोळा॥१०॥
स्वामी स्पर्शे अनेकांचे झाले सोने
सुंदरा बाईचे विटा-रेती, चुने॥११॥
देवाचे दरबाराता अनेक अत्याचार
गरीब भक्ता पिडले वारंवार॥१२॥
स्वामी शरण स्वामी चरण
भक्त पसरती हात उपरण॥१३॥
नालायक सुंदरा पळवी भात वरण
आधी अपंग सुंदराचा दुखे चरण॥१४॥
स्वामी कृपेने बरा झाला चरण
सुंदरे सुरू खाण चरण॥१५॥
साधुसंताचा केला अपमान
स्वामीचाही ठेवला नाही मान॥१६॥
भूकेले स्वामी सकाळी
थंड जेवण संध्याकाळी॥१७॥
सुंदरा नागीण कोवळी
रंग बदलून होई हिरवीपिवळी॥१८॥
बाळाप्पाचा चोरला बिछाना चादर
नाही ठेवला स्वामींचाही आदर॥१९॥
स्वामींनाही देई जुने धोतर
अपमान जणू खाटीक कादर॥२०॥
स्वामी अंतर्ज्ञानी दिला शाप
पोलिसांकरवी लावला चाप॥२१॥
महाराणींना निरोप सांभाळा मूर्ख पात्र
भक्तिमार्गात वाईट सुंदरा अपात्र॥२२॥
आधुनिक श्रीमंत घरातही सुंदरा
मालिकेतील वाईट असुंदरा॥२३॥
दुष्ट झाल्या कुकर्मी सुंदरा
करती मोठ्यांचा अपमान सुंदरा॥२४॥
श्रीमंत सुशिक्षित आजीला वृद्धाश्रम
गरीब आजोबा जाती अाश्रम॥२५॥
सुशिक्षित मुले गाठती अमेरिका
सुधारण्यास भविष्य पत्रिका॥२६॥
नातू, मुले वरती करती खाका
वेळ नाही पाठवती मिठाई खोका॥२७॥
म्हणती आजी-आजोबा मरो
प्रॉपर्टी फक्त नावावर उरो॥२८॥
मातृपितृ दिनी व्हॉट्सॲपवर बोलणे
मोबाइल खोटे अश्रूने भिजविणे॥२९॥
आईवडिलांना खांदा देण्यास नाही वेळ
साऱ्याचीच मोबाइलने केली भेळ॥३०॥
इंग्लिश मीडियमचा सारा तो नखरा
बालकांना खेळण्या वेळ ना खरा॥३१॥
कसा जन्मेल शिवबा घरा
उभा साने गुरुजी दारोदारा॥३२॥
श्यामची आई रडे ढसाढसा
मदर टेरेसा जिजाई ढसढसा॥३३॥
आयांनो व्हा अंगणातील तुळस
बलराम कृष्ण धरेल बाळस॥३४॥
प्रेमानेच जन्मेल लक्ष्मण राम
प्रेमानेच बनेल भरत खरा राम॥३५॥
बालकृष्णाच्या मुखात दिसे विश्व
तुमच्याही बालकाच्या बुद्धी विश्व॥३६॥
बंद करा तो मोबाइल टीव्ही
बालका तोंडी येणार नाही शिवी॥३७॥
बालका शिकवा रामायण, बिरबल
घरोघरी जन्मे विवेकानंद स्वबळ॥३८॥
बालका शिकवा गीता महाभारत
बालक गाजवेल पूर्ण भारत॥३९॥
स्वामी वदे दिनरात बना तुळशी
विलास वदे होऊ नका आळशी॥४०॥
वाचवेल तुम्हा आयुर्वेद औषध तुळशी
पाणी वाचवा धरण बांधा मुळशी॥४१॥
वाचता ४२ शब्दांच्या लड्या
उद्धरतील स्वामी ४२ पिढ्या॥४२॥

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -