Monday, July 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी स्वतःला संपवण्याचे सत्र सुरुच

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी स्वतःला संपवण्याचे सत्र सुरुच

तरुणाने घेतले स्वतःला जाळून; वाचवण्याच्या प्रयत्नात आईदेखील गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकार शर्थीचे प्रयत्न करत असतानाही मराठा समाजाच्या (Maratha Samaj) तरुणांच्या आत्महत्येच्या घटना (Suicide cases) थांबायचं नाव घेत नाहीत. काल सकाळच्या सुमारास आणखी एक धक्कादायक घटना घडली. अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रूक येथे एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले. त्याचा जीव वाचला असला तरी त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई देखील गंभीररित्या भाजली आहे. सध्या दोघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील गणेश जाधव यांचे कपडेही जळाले. परंतु सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही, असे सांगण्यात आले. पाथरवाला बुद्रूक येथील बसस्थानक परिसरातील ते रहिवासी आहेत.

घाटीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी सांगितले की, सूरज गणेश जाधव असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे तर मंगल गणेश जाधव असे त्याच्या आईचे नाव आहे. सूरज हा ६० टक्के भाजला असून, मंगल जाधव या ३५ टक्के भाजल्या आहेत. दोघांवर घाटी रुग्णालयातील जळीत रुग्णांच्या वॉर्डात उपचार सुरू आहेत.

प्रथम त्यांना उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले असून गोंदी ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही नोंद नव्हती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -