Monday, January 13, 2025
Homeक्रीडाIndia Vs Australia: आज पुन्हा ऑस्ट्रेलियाविरोधात भिडणार टीम इंडिया

India Vs Australia: आज पुन्हा ऑस्ट्रेलियाविरोधात भिडणार टीम इंडिया

मुंबई: विश्वचषक २०२३च्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा निराशाजनक पराभव विसरून आता भारतीय संघ पुढील प्रवासासाठी निघाला आहे. भारतीय संघ मायभूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना आज २३ नोव्हेंबरला विशाखापट्टणम येथे संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाईल.

सूर्यकुमार यादवलाही ही निराशा विसरून या टी-२० मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंचे नेतृत्व करावे लागेल. विश्वचषकातील पराभव विसरणे तितकेसे सोपे नाही मात्र पुन्हा सूर्यकुमारला केवळ ९६ तासांच्या आता मजबूत ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाचे नेतृत्व करावे लागेल. त्याला आत्मचिंतन करण्याची संधीही मिळाली नाही. मात्र टी-२० हा प्रकार त्याचा आवडता आहे आणि यात खेळण्यासाठी तो तयार आहे.

संघाचा कर्णधार होण्याच्या नात्याने त्याची जबाबदारी केवळ विजय मिळवणे नाही तर त्या खेळाडूंची ओळख करणे असेल जे पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी आपली दावेदारी सिद्ध करू शकतात.

टी-२० विश्वचषकाआधी खेळावे लागतील इतके सामने

पुढील वर्षी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ची सुरूवात ४ जून २०२४ पासून होईल. या आधी भारतीय संघ एकूण ११ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. सोबतच वर्ल्डकपआधी आयपीएल २०२४चा हंगामही खेळवला जाणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका खास असणार आहे.

भारतीय युवा खेळाडूंसाठी वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवण्याची ही चांगली संधी आहे. दरम्यान आयपीएलमधील कामगिरीही निवडीसाठी लक्षात घेतली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व टी-२०मधील नंबर १ खेळाडू सूर्यकुमार यादव करत आहे.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामने खेळायचे आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध जानेवारीमध्ये ३ सामने खेळावे लागतील. यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका असेल. त्यानतंतर आयपीएल खेळवले जाईल.

मालिकेसाठी दोन्ही संघ

भारत टीम : ईशान किशन (विकेटकीपर), यशस्वी जयसवाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, वाशिंगटन सुंदर, आवेश खान, ऋतुराज गायकवाड़ , जितेश शर्मा

ऑस्ट्रेलिया टीम : ट्रेविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, जोश इंगलिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर/कर्णधार), सीन एबॉट, एडम जाम्पा, नाथन एलिस, जेसन बेहरेनडोर्फ, तनवीर सांघा, केन रिचर्डसन, एरोन हार्डी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -