मुंबई: भारतीय संघाने(team india) ऑस्ट्रेलियाविरुद्ध(india vs australia) ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरूवात विजयासह जबरदस्त केली आहे. मालिकेतील पहिला सामना गुरूवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने या पहिल्या सामन्यात कांगारू संघाला २ विकेटनी मात दिली.
सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०९ धावांचे आव्हान दिले होते. याच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय संघाने २२ धावांवर आपले दोनही सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयसवाल यांच्या रूपात आपले दोन विकेट गमावले होते. यानंतर सूर्यकुमार यादवने कर्णधाराला साजेशी खेळी केली. यानंतर त्याने ईशान किशनसह मिळून तिसऱ्या विकेटसाठी ६० बॉलमध्ये ११२ धावांची भागीदारी केली.
रिंकू सिंहने षटकार ठोकत जिंकून दिला सामना
ईशान किशनने ३७ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. हे त्याचे पाचवे अर्धशतक होते. इशानने या सामन्यात ३९ बॉलमध्ये ५८ धावा करत बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजूने सूर्याची खेळी सुरू होती. त्याने २९ चेंडूत आपले टी-२० अर्धशतक ठोकले. त्याचे हे १६वे अर्धशतक होते. यानंतर सामन्यात ४२ चेंडूत एकूण ८० धावांची खेळी करत सामना जिंकून दिला.
इशानने आपल्या डावात ५ षटकार आणि २ शानदार चौकार लगावले. तर सूर्यकुमारने आपल्या खेळीदरम्यान ४ षटकार आणि ९ दमदार चौकार लगावले. ईशानचा स्ट्राईक रेट १४८.७१ आणि सूर्याचचा १९०.४७ इतका होता. अखेरीस रिंकू सिंहने १४ बॉलमध्ये नाबाद २२ धावा केल्या. शेवटच्या बॉलवर १ धाव हवी होती तेव्हा रिंकूने षटकार ठोकला. मात्र नोबॉल असल्याने षटकार बाद ठरला.