Friday, July 11, 2025

Rahul gandhi: 'त्या' विधानावर राहुल गांधींना मोठा झटका, ECI ने पाठवली नोटीस, दोन दिवसांत द्यावे लागेल उत्तर

Rahul gandhi: 'त्या' विधानावर राहुल गांधींना मोठा झटका, ECI ने पाठवली नोटीस, दोन दिवसांत द्यावे लागेल उत्तर

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी(rahul gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत(pm narendra modi) केलेल्या अपमानजनक विधानाबाबत निवडणूक आयोगाने गुरूवारी झटका दिला. या प्रकरणी आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत शनिवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.


भाजपने बुधवारीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. पार्टी सचिव राधा मोहन दास अग्रवाल आणि एका अन्य पदाधिकारी ओम पाठसह प्रतिनिधीमंडळामध्ये सामील इतर नेत्यांनी राहुल गांधीचे हे विधान अपमानजनक असल्याचे म्हटले होते.


राहुल गांधी यांनी क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या पराभवानंतर पंतप्रधान मोदींबद्दल अपमानजनक विधान केले होते. भारताने ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या मात्र ऑस्ट्रेलियाने केवळ ४३ षटकांत भारताने दिलेले आव्हान पूर्ण करत सामना जिंकला होता.

Comments
Add Comment