Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World Cup Record: विश्वचषक २०२३मध्ये चौकार, षटकारांचा पाऊस

World Cup Record: विश्वचषक २०२३मध्ये चौकार, षटकारांचा पाऊस

मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३(world cup 2023) फलंदाजांसाठी खूपच चांगले ठरले कारण या स्पर्धेत आतापर्यंतच्या हंगामापैकी सर्वाधिक चौकार तसेच षटकार पाहायला मिळाले. १९७५पासून सुरू झालेल्या स्पर्धेपैकी १३वा हंगामा भारतात पार पडला. यात ऑस्ट्रेलियाचा संघ चॅम्पियन ठरला. भलेही फायनलमध्ये भारताच्या पराभवाने कोट्यावधी चाहत्यांचे मन निराश झाले मात्र स्पर्धेदरम्यान झालेल्या चौकार-षटकारांच्या पावसामुळे चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.

भारताच्या यजमानपदाखाली खेळवण्यात आलेल्या विश्वचषकात सर्वाधिक ६४४ षटकार पाहायला मिळाले. गेल्या १२ हंगामात इतके षटकार ठोकण्यात आले नव्हते. याआधी इंग्लंडच्या भूमीवर खेळवण्यात आलेल्या २०१९च्या विश्वचषकात ४६३ षटकार ठोकले गेले होते. तो एक रेकॉर्डच होता. मात्र यावेळी फलंदाजांनी १८१ अधिक षटकार ठोकत नवा रेकॉर्ड केला. रोहित शर्माने २०२३च्या स्पर्धेत सर्वाधिक ३१ षटकार ठोकले.

याशिवाय स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा पाऊस पाहायला मिळाला. फलंदाजांनी या स्पर्धेत एकूण ४० शतके पाहायला मिळाली. गेल्या स्पर्धेच्या तुलनेत ही षटके अधिक होती. गेल्या १२ हंगामातील ही सर्वाधिक शतके होती. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ४ शतके ठोकली. तर भारतासाठी विराट कोहलीने ३ शतके ठोकली. याशिवाय न्यूझीलंडचा युवा क्रिकेटर रचिन रवींद्रने ३ शतके ठोकली. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने स्पर्धेतील सर्वात मोठा स्कोर केला होता. अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात मॅक्सवेलने नाबाद २०१ धावा ठोकल्या होत्या.

विराटची सर्वाधिक धावसंख्या

विराट कोहलीने वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा केल्या. भारतीय फलंदाजाने ११ सामन्यांमध्ये ११ डावांत ९५६२च्या सरासरीने ७६५ धावा केल्या. यात ३ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीला २०२३च्या विश्वचषकात प्लेयर ऑफ दी टूर्नामेंट ठरवण्यात आले. ७६५ धावांसह कोहली या विश्वचषकात सर्वाधिक धावा कऱणारा फलंदाज ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -