Thursday, July 18, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : उद्धव ठाकरे 'मुल्ला' तर संजय राऊत 'मुतवल्ली'

Nitesh Rane : उद्धव ठाकरे ‘मुल्ला’ तर संजय राऊत ‘मुतवल्ली’

आमदार नितेश राणे यांची खरमरीत टीका

मुंबई : मातोश्री मधला ‘मुल्ला’ आणि दिल्लीच्या ‘मम्मी’ला खूष करण्यासाठी आज भांडूपच्या ‘मुतवल्ली’ने सुर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

आज सकाळी १० जनपथचा नवीन कामगार ज्याचा पगार राहुल गांधीकडुन येतोय. तो आज ‘नॅशनल हेराल्ड’ची बाजू मांडताना दिसला. जी बाजू नॅशनल हेराल्ड काँग्रेसचे काम करते तेच काम आता सामना करत आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एक वक्तव्य केलं होतं की, २५-३० वर्ष वाघ कमळासोबत होता पण आता नाही. शहरातील परिस्थिती वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या लायकीची राहिलेली नाही. आधी भाजपशी युती करण्यासाठी दिल्लीच्या वार्‍या केलेल्या उद्धव ठाकरेंना असं वक्तव्य केल्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सणसणीत चपराक लगावली आहे.

तेव्हा भाजपसोबत युती करणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हा वाघ होता आणि उद्धव हा केवळ ‘मुल्ला’ आहे, अशा शब्दांत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. तर डॉक्टर महिलेच्या घरावर दारूच्या बाटल्या मारणा-यावर कारवाई करण्याची मागणी मी गृहमंत्रालयाला करणार असल्याचा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे म्हणाले की, २५ वर्ष ज्या शिवसेनेसोबत भाजपची युती होती तो बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ होता. जेव्हा भाजपला कळलं की हा मुल्ला उद्धव ठाकरे आहे आणि वाघाचं मांजर झालेलं आहे, तेव्हा त्याची लायकी ओळखून त्याला रस्त्यावर सोडून दिलं आहे. म्हणून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणं हा उत्तम पर्याय २०२४ च्या नंतर राहिल्यामुळे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये कोणती नोकरी मिळत असेल तर उद्धव ठाकरे यांनी करावी, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

नॅशनल हेराल्डचं समर्थन म्हणजे भ्रष्टाचाराचं समर्थन

आज सकाळी राहुल गांधीकडून (Rahul Gandhi) पगार घेणारा दहा जनपथचा नवीन कामगार नॅशनल हेराल्डची (National Herald) बाजू मांडताना दिसला. जी भूमिका नॅशनल हेराल्ड काँग्रेससाठी निभावते तीच भूमिका सामना महाराष्ट्रात करत असल्यामुळे आणि फेकलेल्या तुकड्याशी निष्ठा असल्यामुळे संजय राजाराम राऊतने नॅशनल हेराल्डची वकिली केली. २५ हजार ते ३० हजारच्या नाममात्र रुपयांवरुन कंपनी स्थापन करायची आणि कंपनी उभी करण्याच्या निमित्ताने दोन हजार कोटी बळकवायचे, यामुळे गांधी कुटुंबावर झालेल्या कारवाईचं समर्थन म्हणजे भ्रष्टाचाराचं समर्थन करण्यासारखं आहे.

नॅशनल हेराल्डचं समर्थन संजय राऊत करणारच. कारण ज्या पद्धतीने यंग इंडिया स्थापन करुन भ्रष्टाचार करायचा, पैसे खिशात टाकायचे, तेच काम प्रबोधन ट्रस्टच्या नावाने सामना कडून होताना दिसत आहे. दोघांचा ढाचा एकच आहे. त्यामुळे राऊतांनी नॅशनल हेराल्डचं समर्थन करणं हे अपेक्षितच आहे, असं नितेश राणे म्हणाले.

नरेंद्र मोदी खर्‍या अर्थाने ‘राष्ट्रपिता’

पनवती ह्या शब्दावर मोठं वक्तव्य करण्याची हिंमत संजय राऊतने केली आहे. १९ नोव्हेंबर ही प्रियंका गांधीच्या म्हणण्याप्रमाणे जर इंदिरा गांधी यांची जयंती होती, तर मग भारत जिंकलाच पाहिजे होता. मग खरी पनवती कोण? गांधी कुटुंबामुळे ६०-७० वर्षे देशाला जी पनवती लागली होती ती २०१४ला मोदीजींच्या नावाने दूर झाली आहे. मोदीजींनी देशाचा पालक कसा असतो हे खर्‍या अर्थाने दाखवून दिलं आहे. ते फक्त स्टेडिअममध्ये उपस्थित राहिले नाहीत, तर नंतर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंचं मनोबल वाढवलं, त्यांना धीर दिला. याला खर्‍या अर्थाने फादर ऑफ द नेशन म्हणजेच ‘राष्ट्रपिता’ म्हणतात. जो आपल्या देशाचाही नाही जो अर्धा इटालियन आहे, ज्याचं नागरिकत्व कदाचित ब्रिटीश असेल आणि जो मूळतः आपल्या देशाचा नाही त्या राहुल गांधीला देशप्रेम आणि भारतीयांवर प्रेम हे कधीच कळणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.

भ्रष्टाचारासाठी मोदी सरकार म्हणजे ‘ना खाऊँगा, ना खाने दूँगा’

संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या वेडयावाकड्या आरोपांवर चोख प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, सकाळी नाईन्टी मारल्याचा हा इफेक्ट आहे. त्यांनी कधीतरी कोणत्या तरी पत्रकार परिषदेत आम्हाला सांगावं की, भाजप मध्ये आल्यावर कोणाची प्रॉपर्टी मोकळी झाली आहे? आणि भ्रष्टाचारावर कारवाई करणं म्हणजे राजकीय सूड उगवणं नाही. नॅशनल हेराल्डने मोठा भ्रष्टाचार केला आहे ज्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी बेलवर आहेत. देशात भ्रष्टाचार थांबवायचा नाही तर मग केंद्र सरकारने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन द्यायचं का? हे काय यूपीआयचं सरकार नाही. हे एनडीएचं सरकार आहे, नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. ‘ना खाऊँगा, ना खाने दूँगा’. त्यामुळे ज्यांनी जनतेचा पैसा लुटला आहे, त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार, असं नितेश राणे म्हणाले.

‘त्या’ प्रकरणाची देखील सखोल चौकशी व्हावी

शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात ही गृहमंत्रालयाची विकृती आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर नितेश राणे यांनी त्यांना कडक शब्दांत ठणकावले की, मी स्वतः देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रायाला एक विनंती करणार आहे की, ज्या डॉक्टर महिलेच्या घरी रात्री ज्याने दारुच्या बाटल्या मारल्या, धमकीचं पत्र पाठवलं, त्याही प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. ही मागणी मी येणार्‍या अधिवेशनात करणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत दहा जनपथची ‘चाटूगिरी’ करणारच

संजय राऊतचा पगार अगर दहा जनपथवरुन येत असेल, मातोश्रीची मम्मी त्या ठिकाणी बसली असेल, तर दहा जनपथची ‘चाटूगिरी’ हा करणारच. त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय? ज्या नॅशनल हेराल्डमुळे बाळासाहेबांवर वर्षानुवर्षे टीका झाली त्या नॅशनल हेराल्डची बाजू घेताना संजय राऊतला लाज वाटत नाही, याचं मला आश्चर्य वाटतंय, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -