भाजप आमदार नितेश राणे यांनी उडवली आदित्य ठाकरेंच्या खळा बैठकांची खिल्ली
मुंबई : उद्यापासून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) कोकणात ज्या खळा बैठका घेणार आहेत, त्याबाबत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक वेगळाच खुलासा केला आहे. आदित्य ठाकरे नेमके कशासाठी या खळा बैठका घेणार आहेत? असा सवाल उपस्थित करत खळा बैठकांच्या निमित्ताने पेंग्विनला गोव्यामध्ये फिल्म फेस्टिव्हलमधील (Goa Film Festival) नट्यांसोबत नाचगाणे करायला जायचं असल्याची खिल्ली नितेश राणे यांनी उडवली आहे.
नितेश राणे म्हणाले, त्यांची संघटनाच मुळात खिळखिळी झालेली आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की, खळा बैठक आणि आदित्य ठाकरेचा सिंधुदुर्ग दौरा आणि गोव्यामध्ये फिल्म फेस्टिव्हल असणं यात आम्हाला साम्य का दिसतंय? नक्की सिंधुदुर्गावर प्रेम आहे की बॉलिवूडच्या फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावायची आहे? पार्टी करायची आहे? सिंधुदुर्ग तो बहाना है, पेंग्विन को गोवा में बॉलिवूड के ऍक्टरों के साथ नाचना है, असा तो विषय आहे. म्हणून याचं उत्तर काही दिवसांत गोव्याचे फोटोग्राफ्स देऊन आम्ही करु, असं नितेश राणे म्हणाले.