Thursday, July 18, 2024
HomeमनोरंजनMiss Universe 2023 : आत्महत्याच करणार होती; पण आता गाजवली मिस युनिव्हर्स...

Miss Universe 2023 : आत्महत्याच करणार होती; पण आता गाजवली मिस युनिव्हर्स स्पर्धा!

जेन दीपिका गॅरेट ठरली मिस युनिव्हर्समधील पहिली प्लस साईज मॉडेल

सॅन साल्वाडोर : मिस युनिव्हर्स २०२३ (Miss Universe 2023) स्पर्धा १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी एल साल्वाडोर (El Salvador) येथे आयोजित करण्यात आली होती. जिथे निकाराग्वाची शेयनिस पॅलासिओस (Sheynnis Palacios of Nicaragua) विजयी झाली. पॅलासिओसने जगभरातील देशांतील ८३ इतर प्रवेशकर्त्यांना हरवले. पण तिच्या विजयापेक्षाही, यंदाची स्पर्धा काही खास नियमांसाठी चर्चेत होती.

या वर्षी, मिस युनिव्हर्सने विवाहित, विभक्त आणि घटस्फोटित महिलांनाही सहभागाची परवानगी दिली आणि ट्रान्सवुमन (Transwoman) तसेच अधिक आकाराच्या महिलांनाही सहभागाची संधी होती. यातील ज्यांना पारितोषिक पटकावता आले नाही पण तरीही जे चर्चेत राहिले त्यांच्यापैकी एक म्हणजे मिस नेपाळ जेन दीपिका गॅरेट (Jane Dipika Garrett). ही प्लस-साईज मॉडेल (Plus Size Model) प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. ती मिस युनिव्हर्समधील पहिली प्लस साईज मॉडेल ठरली आहे.

‘मिस युनिव्हर्स २०२३’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या मिस नेपाळ जेन दीपिका गैरेटने झिरो फिगर, फिट अॅन्ड फाईन असा टॅग मोडून काढला आणि बॉडी पॉजिटिव्हिटीचा संदेश दिला. सौंदर्यवतींनी आपल्या साईजकडे लक्ष न देता फॅशन आणि सौंदर्य तसेच लूककडे लक्ष द्यायला हवं, असं तिचं मत आहे.

जेन मिस युनिव्हर्स २०२३ मध्ये जिंकू शकली नाही किंवा अंतिम फेरीत पोहोचली नाही, तरीही ती भारताच्या श्वेता शारदा सोबत टॉप २० मध्ये होती. याआधी, तिच्या आत्मविश्वासपूर्ण वागणुकीमुळे आणि शरीराच्या सकारात्मकतेच्या संदेशामुळे, ती स्पर्धेमध्ये आधीच प्रेक्षकांची आवडती बनली होती. जेव्हा ती स्टेजवर येईल तेव्हा उपस्थित गर्दी टाळ्यांचा कडकडाट करत तिला चीअर अप करत होती. किताब जिंकला नसला तरी तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली.

कोण आहे जेन दीपिका गॅरेट?

जेन दीपिका गॅरेटचा जन्म अमेरिकेत झाला. सध्या ती नेपाळमधील काठमांडू परिसरात राहते. ती मॉडेल असण्यासोबत नर्स आणि बिझनेस डेव्हलपरदेखील आहे. महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी तिने प्रयत्न केले आहेत. बॉडी पॉजिटिव्हिटीचा चांगला संदेश देणाऱ्यांच्या यादीत जेन दीपिका गैरेटचा समावेश होतो. सध्या जगभरात तिचं नाव चर्चेत आहे.

आत्महत्येचा केला होता प्रयत्न

जेनची ऊंची पाच फूट सात इंच आणि वजन ८० किलो आहे. हार्मोन्सच्या समस्यांमुळे जेनचं वजन वाढलं. वाढलेल्या वजनामुळे तिला अनेकांच्या चिडवण्याचा देखील सामना करावा लागला होता. एका वर्षाआधी तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण नंतर ती पूर्ण आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरली आणि आता याच वाढलेल्या वजनाची तिने जगाला दखल घ्यायला लावली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -