Sunday, May 11, 2025

देशमहत्वाची बातमी

Jammu-kashmir : राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ अधिकाऱ्यांसह ४ शहीद

Jammu-kashmir : राजौरीमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ अधिकाऱ्यांसह ४ शहीद

राजौरी: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये बाजी माल भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन अधिकारी तसेच दोन जवान शहीद झाले आहेत तर एक जवान जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उधमपूर रुग्णालयात उपचार सुरू आहे.


शहीद अधिकाऱ्यांचे मृतदेह जंगलातून बाहेर आणण्यात आले आहेत. जम्मूचे आयजी आनंद जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार राजौरीच्या कालाकोट परिसरातील धर्मसाल ठाणे क्षेत्रातील सोलकी गावाचे बाजी माल परिसरात कमीत कमी दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या भागात विशेष सूचना देत घेराबंदी करून तपास अभियान सुरू करण्यात आले होते.


या चकमकीदरम्यान दोन कॅप्टन आणि एक जवान शहीद झाले आहेत. यामुळे गावांत शोककळा पसरली आहे. सेनाने जंगलातील या भागात चारही बाजूंनी घेराबंदी घातली आहे.



काश्मीर पोलीस आणि सेनेच्या जवानांनी परिसराला घेरले


परिसराला केलेल्या घेराबंदीमध्ये काश्मीर पोलीस आणि भारतीय सेनेचे काही जवान तैनात आहेत. त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. जंगलाचा भाग असल्याने येथे दहशतवाद्यांचे ठिकाण शोधणे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्रास हो आहे. दरम्यान, त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इतर मार्गही चाचपडले जात आहेत.

Comments
Add Comment