
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली यामुळे लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. मात्र चाहत्यांच्या हाती निराशा आली.
दुसरीकडे भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास निश्चितच फायनलमध्ये झालेला पराभव खेळाडूंसाठी निराशाजनक ठरला. मात्र संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केल्यामुळे त्यांना बक्षीस मिळणे नक्की आहे.
जास्त फीची डिमांड
मीडिया रिपोर्ट्सनुसार भले भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला नाही मात्र सर्व प्रमुख खेळाडूंची कमाई जबरदस्त वाढणार आहे. याचे कारण आहे वर्ल्डकपमधील खेळाडूंच्या जबरदस्त कामगिरीनंतर अनेक खेळाडूंची ब्राँड व्हॅल्यू वाढली आहे.
या कारणामुळे वाढणार आहे व्हॅल्यू
ईटीच्या रिपोर्टनुसार स्पोर्ट्स मार्केटिंग कंपनी राईज वर्ल्डवाईडचे हेड ऑफ स्पॉन्सरशिप सेल्स अँड टॅलेंट निखिल बर्डिया यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार भले टीम इंडियाच्या खेळाडूंवर वर्ल्डकप जिंकण्याचा टॅग लागला नाही मात्र संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळाडू हिरो म्हणून समोर आले आहे. यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत नक्कीच वाढ झाली आहे.