Monday, July 15, 2024
Homeदेशन्यूमोनियाच्या उपचारासाठी बाळाला गरम सळीने दिले ४० चटके, आई, आजी आणि आयाविरोधात...

न्यूमोनियाच्या उपचारासाठी बाळाला गरम सळीने दिले ४० चटके, आई, आजी आणि आयाविरोधात गुन्हा दाखल

भोपाळ: मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यातील एका गावात न्यूमोनियाने पीडित दीड महिन्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याला लोखंडाच्या सळीने तब्बल ४० वेळा चटके देण्यात आले. या प्रकरणी आया आणि मुलाच्या आईसह तीन लोकांविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की या बाळावर शहडोलच्या सरकारी मेडिकल कॉलेज तसेच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या महिन्याच्या सुरूवातीस जेव्हा या मुलाची तब्येत अधिकच बिघडली तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मुलाची मान, पोट तसेच शरीराच्या इतर भागांवर तब्बल ४०हून अधिक वेळा डागण्यात आले होते. या प्रकरणी त्या बाळाची आई बेतलवती बैगा, आया बूटी बाई बैगा आणि आजी रजनी बैगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरदी गावात राहणाऱ्या मुलाच्या कुटुंबाईने ा आयाशी संपर्क साधला होता. तिने ४ नोव्हेंबरला न्यूमोनियाच्या उपचारासाठी लोखंडाच्या सळीने ४०हून अधिक वेळा डागले होते. बाळाच्या उपचारासाठी आजीने आपल्या घरी आयाकडून लोखंडी सळीने उपचार केला. जेव्हा बाळाची तब्येत जास्त बिघडली तेव्हा बाळाला मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आदिवासी भागात लोखंडी सळीने डागण्याचे प्रकार नेहमीचेच

जिल्ह्यातील आदिवासी भागात मुलांच्या उपचारासाठी त्यांना लोखंडी सळीने डाग देण्याचे प्रकार हे सर्रास केले जातात. या वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूमोनियाच्या उपचारासाठी ५० वेळाहून अधिक गरम सळीने चटके दिल्याने अडीच महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -