Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीराज्याच्या पोलीस खात्यात पुन्हा एकदा खांदेपालट!

राज्याच्या पोलीस खात्यात पुन्हा एकदा खांदेपालट!

नाशिक : राज्याच्या पोलीस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली आहे. गृह विभागाने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यात नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मुंबई येथे व्हीआयपी सुरक्षा व राज्य गुप्तवार्ता विभागात बदली केली आहे. शिंदे यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती झाली आहे.

अंकुश शिंदे यांची डिसेंबर २०२२ मध्ये नाशिकला बदली झाली होती. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखांचे विभाजन करीत चार पथके नेमली होती.

पुणे पोलीस आयुक्तालयातील सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. कर्णिक हे इलेक्ट्रिकल इंजीनियर पदवी प्राप्त केली.

त्यानंतर २००४ च्या बॅचचे आयपीएस (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी आहेत. त्यांनी अहमदनगर, ठाणे, नागपुर, जालना, नांदेड यासह पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. मुंबईत त्यांनी अप्पर आयुक्त म्हणून कर्तव्य बजावले आहे.

एकाच वेळी तब्बल १९ पोलीस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारकुंड यांनी यापूर्वी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे विभागाची जबाबदारी सांभाळलेली होती.

तसेच नाशिक ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे-केदार यांची अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर आदित्य धनंजय मिरखेलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कांगणे यांनी नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलात सात ते आठ वर्ष सेवा बजावली आहे. तर गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण संस्था नाशिकचे प्राचार्य अशोक नखाते यांची जळगाव येथे अप्पर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, याशिवाय जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला केल्यानंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले तुषार दोषी यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांची थेट गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला प्रश्न देखील विचारला आहे.

बदली झालेले अधिकारी खालीलप्रमाणे

विशाल सिंगुरी, पोलिस अधीक्षक- नक्षल विरोधी अभियान (पोलिस अधीक्षक- अमरावती ग्रामीण).

तुषार दोषी (जालना- पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक धुळे (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक).

श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक लोहमार्ग पुणे (पोलिस अधीक्षक धुळे).

प्रीतम यावलकर, पोलिस अधीक्षक, सायबर मुंबई (अतिरिक्त अधीक्षक, सोलापूर ग्रामीण).

कविता नेरकर, अतिरिक्त अधीक्षक अंबाजोगाई (पोलिस अधीक्षक सायबर मुंबई)

दिनेश बारी, पोलिस अधीक्षक सीआयडी (पोलिस अधीक्षक फोर्स वन मुंबई).

श्रीनिवास घाडगे (पुणे शहर- नागरी हक्क संरक्षण, नागपूर),

गणेश शिंदे, अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे (पोलिस उपायुक्त अमरावती).

अनुज तारे, अतिरिक्त अधीक्षक गडचिरोली (पोलिस अधीक्षक वाशीम).

नवनीत कुमार कॉवत, अतिरिक्त अधीक्षक धाराशिव (पोलिस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर).

मोक्षदा पाटील, पोलिस अधीक्षक लोहमार्ग, छत्रपती संभाजीनगर (समादेशक, राज्य राखीव पोलिस बल-८ मुंबई).

अशोक बनकर, अतिरिक्त अधीक्षक गोंदिया (प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना).

माधुरी केदार, अतिरिक्त अधीक्षक नाशिक ग्रामीण (अतिरिक्त अधीक्षक लोहमार्ग पुणे).

चंद्रकांत गवळी, अतिरिक्त अधीक्षक जळगाव (प्राचार्य गुप्तचर प्रशिक्षण शाळा, नाशिक).

हिमत जाधव, अतिरिक्त अधीक्षक सोलापूर ग्रामीण (पोलिस उपायुक्त मुंबई).

शशिकांत सातव अतिरिक्त अधीक्षक अमरावती (पोलिस उपायुक्त नागपूर).

अशोक नखाते, प्राचार्य (अतिरिक्त अधीक्षक जळगाव).

विक्रम साळी, पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण नाशिक (अतिरिक्त अधीक्षक अमरावती ग्रामीण).

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -