मुंबई : कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीएसटी रोड शांतीनगरच्या समोरील बाजूला मेट्रोच्या बांधकाम साईटवर सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. संबंधित महिला धारावी येथे राहणारी होती. चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने ही हत्या केल्याचा संशय आहे. गुन्हे शाखा कक्ष ५ ने हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. ते दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये (Live In Relation) राहत होते.
पोलिसांनी त्या जागेवर जाऊन सुटकेसची तपासणी केली असता त्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह मिळून आला. सुटकेसमध्ये मृतदेह असल्याने या प्रकरणात खुनाची बाब स्पष्टपणे दिसून येत होती. महिलेने टीशर्ट आणि नाईट पॅन्ट घातली होती. महिलेचा मृतदेह ज्या सुटकेस बॅगेत आढळला त्यावरुन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दोघे किती वर्षापासून एकत्र होते? हत्येचे नेमकं कारण काय? याचा तपास आता पोलिस करत आहेत.
Crime : वर्ल्डकपचा सामना आणि छट पुजा सुरू असतानाच सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
याआधीही लिव्ह इन रिलेशनमधील श्रद्धा वालकर, मिरा भाईंदरमध्ये सरस्वती वैद्य हत्या प्रकरण अशा अनेक तरूणींची अमानुषरीतीने हत्या करण्यात आल्या आहेत.