16 MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी

कधी लागणार हा प्रश्न मार्गी?


मुंबई : ठाकरे गट (Thackeray Group) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) यांच्यातील संघर्षात आमदार अपात्रतेचा (MLA Disqualification) निकाल कधी लागणार, हा एक मोठा प्रश्न आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. मागच्या २ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरवर ढकलण्यात आली. त्यानुसार आजपासून पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे.


दीड तास झालेल्या २ नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी व्हिपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. आमदारांना जारी करण्यात आलेला व्हिप हा ई मेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाच्या वकिलांनी केला. तर तो व्हिप आपल्याला मिळालाच नसल्याने व्हिपचे उल्लंघन केले असल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितले.


विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत व्हीपबाबत दोन्हीकडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला. विधानसभा अध्यक्ष त्यावेळी म्हणाले होते की, मला मर्यादित वेळेत ही सुनावणी घ्यायची आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होतोय. त्यानुसार अध्यक्षांनी १६ नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गटांना पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते.


दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिलेले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर सुनावणी पार पडावी, यादृष्टीने प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुसार आजपासून पुढील सुनावणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधिमंडळात सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.