पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार महापूजा

मराठा समाजाचे आंदोलन मागे, पाच मागण्या मान्य


पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा न करू देण्याचा इशारा मराठा समाजाने दिला होता. मात्र, प्रशासनाकडून सुरू असलेल्या सततच्या चर्चेनंतर आता मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना विठुरायाची पूजा करता येणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रशासनासमोर पाच मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांवर सकारात्मक उत्तर सरकारकडून आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना पूजा न करू देण्याचे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. या दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत ३० मिनिटे चर्चा करणार आहेत.


गेल्या काही दिवसापासून मराठा आंदोलकांच्या भूमिकेमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. मात्र, सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूरमध्ये येताच प्रशासनाची सूत्रे वेगाने हलू लागली. एका बाजूला उपमुख्यमंत्र्यांच्या महापूजेवरून मराठा आंदोलकांमध्ये दोन गट पडले असताना दुसऱ्या बाजूला आदिवासी कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत पंढरपुरात न येऊ देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे पुन्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. त्यानंतर प्रशासनाने मराठा आरक्षण आंदोलकांच्या सगळ्या गटांसोबत चर्चा केली.


मराठा आरक्षण आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिष्टमंडळाने पाच मागण्या समोर ठेवल्या. प्रशासनाने मागण्या मान्य असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या या माहितीनंतर मराठा आंदोलक गणेश महाराज जाधव यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

Comments
Add Comment

Jalgaon: प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करुन काढली धिंड; जळगावमधील क्रूर घटना

जळगाव: प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाला नग्न करून बेदम मारहाण करून त्याची गावभर

LPG Cylinder: गॅस सिलिंडर बुक होत नसेल तर कुठे तक्रार कराल? 'या' हेल्पलाईन नंबरवर तात्काळ मिळेल मदत

मुंबई: मागील काही दिवसांपासून अनेक लोकांना एलपीजी सिलिंडर बुक करताना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा पण...

मुंबई: हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर