नवी दिल्ली: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये १२ नोव्हेंबरपासून सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याच्या दिशेने मोठे यश हाती आले आहे. सर्व मजुरांचे पहिले फोटो समोर आले आहेत.
रेस्क्यू टीमच्या कॅमेऱ्यामध्ये या मजुरांचा फोटो आला आहे त्यातून ते कशा परिस्थितीत आहेत हे समोर आले आहे. सिलक्यारा बोगद्यात अडकलेले मजूर पूर्णपणे सुरक्षित आहेत. आज बचाव कार्याचा १०वा दिवस आहे आणि आजपासून वर्टिकल ड्रिलिंगही सुरू केले जाईल.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel collapse: Rescue workers try to make contact with the trapped workers through walkie-talkie pic.twitter.com/mCr5VRfSi0
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 21, 2023
गेल्या १० दिवसांपासून बचाव कार्यात गुंतलेल्या रेस्क्यू टीमचा कॅमेरा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांपर्यंत पोहोचला. यामुळे मजुरांचे फोटो समोर येऊ शकले. दिलासादायक बाब म्हणजे सर्व मजुर सुरक्षित आहेत. तसेच त्यांच्यापर्यंत गरजेचे सामान पोहोचवले जात आहे. वॉकी टॉकीच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलण्यातही आले. इतकंच नव्हे तर पाईपच्या माध्यमातून मजुरांना मोबाईल फोन तसेच चार्जरही पाठवण्यात आला.
बचावपथकाला सोमवारी सिलक्यारा बोगद्याच्या विरुद्ध दिशेले ड्रिंलिंग करत मलब्याच्या आर पार ५३ मीटर लांब सहा इंच व्यासाची पाईपलाईन टाकण्यात यश मिळआले. यामुळे गेल्या आठ दिवसांत बोगद्यात अडकलेल्या कामगारांना खाद्यवस्तू, संचार उपकरण तसेच गरजेच्या वस्तू पोहोचवण्यात आल्या.