मुंबई: अनेकांना चहा(tea) प्यायला प्रचंड आवडतो. ही लोक दिवसभरही चहा पिऊ शकतात. अनेकजण तर थंड चहा वारंवार गरम करून पित असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की असा चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो का?
वारंवार प्यायल्याने तुमची हाडे कमकुवत होतात. यामुळे शारिरीकरित्या त्रासदायक ठरू शकतात. अनेकजण चहा बनवून ठेवतात आणि त्यांना चहाची तल्लफ येथे तेव्हा चहा गरम करून पितात. मात्र अशी सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली असते का?
टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापलेल्या बातमीनुसार, जर तुम्ही लगेचच बनवलेला चहा तुम्ही १५ ते २० मिनिटांनी गरम करून प्यायलात तर ते ठीक आहे. यात कोणतेही नुकसान नाही. आरोग्य तज्ञांच्या मते नेहमी चहा फ्रेश प्यावा. पुन्हा गरम नाही केला तर ते चांगले.
चहा परत गरम केल्याने यातील चहाचा फ्लेवर, सुगंध आणि तत्वाची हानी होते. आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्ही चहा बनवून ४ तास झाले असतील तर तो चहा चुकूनही गरम करू नका. कारण यामुळे शरीरास मोठे नुकसान होऊ शकते. यात बॅक्टेरिया वाढू लागतात. चहा केल्यानंतर एक ते दोन तासांतच बॅक्टेरिया वाढू लागतात. दूधवाली चहामध्ये तर वेगाने बॅक्टेरिया पसरतात.
अनेकांना दुधाची चहा पिणे पसंत करतात. दुधवाल्या चहामध्ये साखरेमुळे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढत असतात. जेव्हा तुम्ही दूध आणि साखर मिसळून चहा बनवता तेव्हा ती लगेचच थंड आणि खराब होते.