Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीVishnu Manohar : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा नवा विक्रम; बनवला तब्बल...

Vishnu Manohar : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा नवा विक्रम; बनवला तब्बल दहा हजार किलोंचा मसालेभात

२५ हजार आदिवासींना खाऊ घातले मसालेभाताचे जेवण

नागपूर : विष्णू मनोहर (Vishnu Manohar) हे नाव पाककलेच्या (Cooking) क्षेत्रात प्रसिद्ध आहे. आज त्यांनी एक नवा विक्रम केला आहे. विष्णू की रसोई, वनवासी कल्याण आश्रम, मैत्री परिवाराने संयुक्त उपक्रम राबवत आज दहा हजार किलोंचा मसालेभात तयार केला. २५ हजार आदिवासी (Tribal) बांधवांमध्ये या मसालेभाताचे (Masalebhat) वाटप करण्यात आले.

बजाज नगरातील ‘विष्णू जी की रसोई’ (Vishnuji ki Rasoi) इथे एका मोठ्या कढईमध्ये मसाले भात तयार करण्याची प्रक्रिया काल रात्री दहाच्या सुमारास सुरू करण्यात आली होती. आज सकाळी सात वाजता हा मसालेभात तयार झाला. मसाले भात तयार करण्यासाठी १८०० किलो तांदूळ, ५०० किलो बटाटे, ३०० किलो तेल, १०० किलो मिरची, ३०० किलो मटार, ५०० किलो कांदे इत्यादी साहित्याचा उपयोग करण्यात आला.

आज नागपुरात आदिवासी समाजाचा एक महामेळावा झाला. त्या महामेळाव्यात नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या संख्येनं जमले होते. जवळजवळ २५ हजारांच्या आसपास आदिवासी यासाठी उपस्थित राहिले होते. त्या ठिकाणी या मसाले भाताचे वितरण केले.

दरम्यान, विष्णू मनोहर यांनी याआधीही असे विक्रम केले आहेत. सलग ५३ तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असा सर्वात मोठा पराठा त्यांनी बनवला होता. त्यांनी तीन तासात ७००० किलोची महामिसळ बनवण्याचा विश्वविक्रम केला होता. शिवाय २५ हजार किलो चिवडा, ३२०० किलो वांग्याचं भरीत इत्यादी पदार्थ तयार करण्याचाही विक्रम त्यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी पाच हजार किलोचा मसालेभात तयार केला होता. आता दहा हजार किलोंचा मसालेभात तयार करुन त्यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -