Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

ED: सोनिया-राहुल गांधींना ईडीचा मोठा झटका, यंग इंडियाची ७५१ कोटींची संपती जप्त

ED: सोनिया-राहुल गांधींना ईडीचा मोठा झटका, यंग इंडियाची ७५१ कोटींची संपती जप्त

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेसशी(congress) संबंधित एजेएल आणि यंग इंडियाची ७५२.९ कोटी रूपयांची संपत्ती मनी लॉड्रिंग(money laundering) अंतर्गत जप्त केली आहे. केंद्रीय तपास विभागाने म्हटले की जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत एजीएलची दिल्ली, मुंबई, लखनऊसह अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. याची एकूण किंमत ६६१.६९ कोटी रूपये आहे.


ईडीने सोशल मीडिया एक्सवर जारी केलेल्या विधानानुसार यंग इंडियन प्रॉपर्टीची किंमत ९०.२१ कोटी रूपये आहे. याबाबत काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे की निवडणूक पाहता ही कारवाई केली जात आहे. खरंतर, कंपनीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भागीदारी आहे.


 


दरदिवशी काँग्रेस सहित इतर विरोधी पक्ष मोदी सरकारवर केंद्रीय तपास विभागाचा दुरूपयोग केल्याचा आरोप लगावत आहे. दरम्यान, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचे म्हणणे आहे की पुराव्याच्या आधारे एजन्सी तपास करत आहे.


Comments
Add Comment