Sunday, May 11, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

David Warner: रिटायरमेंटच्या चर्चांना डेविड वॉर्नरने दिला पूर्णविराम, दिलेत हे मोठे संकेत

David Warner: रिटायरमेंटच्या चर्चांना डेविड वॉर्नरने दिला पूर्णविराम, दिलेत हे मोठे संकेत

मुंबई: डेविड वॉर्नरने स्पष्ट संकेत दिले आहेत की ते पुढील म्हणजेच २०२७ चा वर्ल्डकप खेळताना दिसणार आहे. वॉर्नर २०२३ वर्ल्डकपच्या विजेता संघाला महत्त्वाचा भाग होता. वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सोशल मीडियावर शेअर केलल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की तो पुढील वर्ल्डकप २०२७मध्ये खेळताना दिसू शकतो.


वॉर्नर सध्या ३७ वर्षांचा आहे. त्याने २०२३च्या सुरूवातीला म्हटले होते की पाकिस्तानविरुद्ध डिसेंबर आणि जानेवारीमध्ये खेळवली जाणारी कसोटी मालिका शेवटची असेल. दरम्यान, वॉर्नर वनडेमध्ये क्रिकेट खेळत राहणार आहे. एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटले की वॉर्नरचे वनडे करिअर शानदार रेकॉर्डसह संपेल. या पोस्टला उत्तर देताना वॉर्नरने रिप्लाय केला कोणी म्हटले की मी संपलो आहे? यावरून समजते की तो वनडे क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे आणि वनडे वर्ल्डकप २०२७मध्येही तो खेळू शकतो.



ऑस्ट्रेलियासाठी केल्या सर्वाधिक धावा


वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी वर्ल्डकप २०२३मध्ये सर्वाधिक धावा केल्या. त्याने ११ सामन्यातील ११ डावांत ४८.६४च्या सरासरीने आणि १०८.३० च्या स्ट्राईक रेटने ५३५ धावा केल्या. यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याची सर्वाधिक धावसंख्या १६३ होती. त्याने पाकिस्तानविरुद्ध ही खेळी केली होती.



आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय करिअर


वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी तीनही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने आतापर्यंत १०९ कसोटी, १६१ वनडे आणि ९९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळला आहे. कसोटीच्या १९९ डावांत त्याने ८४८७ धावा, वनडेतील १५९ डावांत ६९३२ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ९९ डावांत २८९४ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने २५ शतके, वनडेत २२ आणि टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एक शतक ठोकले आहे.


Comments
Add Comment